Sambhaji Nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : तुझ्या शिक्षणाचा खर्च झेपेना, मला माफ कर;लाडसावंगीत वडिलांनी संपविले जीवन

सरकार आरक्षण देत नाही तर दुसरीकडे दोन मुलांचा शिक्षणाचा खर्च झेपत नाही, मला माफ कर...अशी चिठ्ठी लिहून अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

करमाड : सरकार आरक्षण देत नाही तर दुसरीकडे दोन मुलांचा शिक्षणाचा खर्च झेपत नाही, मला माफ कर...अशी चिठ्ठी लिहून अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना लाडसावंगी (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे गुरुवारी (ता.२७) सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. बाबासाहेब जनार्दन पडूळ (वय ४७) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

बाबासाहेब पडूळ यांना वीस गुंठे शेतजमीन आहे. त्याच्यावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होते. गुरुवारी सकाळी सहा वाजता ते शेतात जनावरांना चारापाणी करण्यास जात असल्याचे सांगून गेले होते. दरम्यान, साडेसहा वाजता त्यांचे चुलतभाऊ रामू पडूळ हे दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना बाबासाहेब हे लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ घरी माहिती देऊन उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

बाबासाहेब पडूळ यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगी बीएस्सीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेते, तर मुलाने बारावीत ८५ टक्के गुण मिळवून तो इंजिनिअरच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे गेला होता. घरी वीस गुंठे शेतीवर घर खर्च व दोन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्च कसा करावा या विवंचनेत बाबासाहेब पडूळ होते, असे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.

चिठ्ठीवर ‘एक मराठा लाख मराठा’

बाबासाहेब पडूळ यांनी ‘सरकार आरक्षण देत नाही, साहिल मला माफ कर, एक मराठा लाख मराठा’ असा उल्लेख असलेली चिठ्ठी त्यांच्या खिशात सापडली. मागील आठ महिन्यांपासून हे सरकार मराठा आरक्षण देत नाही, अर्धा एकर शेताच्या उत्पन्नावर दोघांचा खर्च, घर चालवण्याचा खर्च...साहिल मला माफ कर, असे या चिठ्ठीत मजकूर लिहिलेला आढळून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT