छत्रपती संभाजीनगर : शहराच्या दहा किलोमीटरच्या आत असलेल्या गावांमध्ये शेकडो गृहप्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यांलगत असलेल्या जमिनीचे भाव ३ ते ७ कोटी रुपये प्रति एकरच्या घरात गेले.
या परिसरात प्लॉट, जमिनीत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या अनेक पटींनी वाढली. परिणामी, शहर परिसरातील जमिनी आता कृषीऐवजी गृहप्रकल्प, प्लॉटिंगसाठी राखीव होत आहेत. त्यामुळे गावांकडे चला; पण प्लॉटिंगसाठी असे म्हणण्याची वेळ आली आहे.
शहरात मोजकीच जमीन शिल्लक असल्याने घरे, दुकानांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिक राहण्यासाठी ग्रामपंचायतींच्या हद्दीला पसंती देत आहेत. शहरापेक्षा ग्रामपंचायतींच्या हद्दीत घरे, प्लॉटच्या किमती काहीशा कमी आहेत.
शिवाय गृहप्रकल्पात पाण्यासह, सर्व सुविधा दिल्या जात असल्याने अनेकांच्या ओढा ग्रामपंचायतींच्या हद्दीकडे येताना दिसत आहे. काही जण भविष्यातील गुंतवणूक शहराजवळ जमिनी खरेदी करीत आहेत.
केंब्रिज ते सावंगी रिंग रोडमुळे पिसादेवी, गोपाळपूर, पोखरी, सावंगी, हर्सूल गावातील जमिनीत गुंतवणूक वाढली. शिवाय येथे प्रत्येक महिन्याला नवीन गृहप्रकल्प सुरू होत आहे. सध्या चिकलठाणा, सावंगी, नायगाव, पिसादेवी,
पोखरी, कोलठाणवाडी, मांडकी, गोपाळपूर, पळशी शहर, शेंद्रा, कुंभेफळ, करमाड, सुंदरवाडी, झाल्टा, बाळापूर, गांधेली, ओव्हर, जटवाडा, वाळूज परिसर, नक्षत्रवाडी ते चित्तेगाव दरम्यान जमिनाला गृहप्रकल्पासाठी सर्वाधिक पसंती आहे.
पिसादेवी, गोपाळपूर, हर्सूल, सावंगी गावात सध्या मुख्य रस्ता, लोकेशननुसार ४ ते ७ कोटी रुपये प्रती एकर दर मिळतो. पिसादेवी-गोपाळपूर-सावंगी येथे कमीत-कमी ३ कोटी रुपये दर आहे. पोखरी गावात २ ते अडीच कोटी तर डोंगराकडे १ कोटींच्या जवळपास दर आहे.
कोलठाणावाडी येथेसुद्धा रस्त्यालगत ३ ते ४ कोटी तर डोंगराकडील भागात ८० लाख १ कोटी दर आहे. पळशी शहर येथे रोडटच जमिनीला २ कोटींपेक्षा जास्त आहे. दर डोंगराकडील जमिनालासुद्धा लाखांमध्ये दर आहे.
नवीन होणाऱ्या वसाहती, धुळे-सोलापूर महामार्गामुळे बाळापूर येथे ३ ते ५ कोटी तर गांधेली येथे २ ते ४ कोटी असा दर मिळत असल्याचे खरेदी-विक्री करणाऱ्या एजंट, बिल्डर, प्लॉटिंगधारकांनी दिली.
ऑरिक, शेंद्र्याचा वाढता विस्तार
प्लॉटिंग, गृहप्रकल्पांत वाढती गुंतवणूक
शहरात जमीन शिल्लक नसणे, शिवाय जास्त दर
आठ पदरी झालेला बीडबायपास रोड
धुळे-सोलापूर महामार्गामुळे विस्तार
पैठण रोडचा होणारा विस्तार
शहरापासून जवळ असलेला समृद्धी महामार्ग
केंब्रिज ते सावंगी रिंग रोड
परिसराला गृहप्रकल्पांसाठी नागरिकांची पसंती
शहरापासून जवळ असल्याने राहण्यासाठी अनेकांनी पिसादेवी गावाला पसंती दिली. त्यामुळे पाच वर्षांत येथे मोठे गृहप्रकल्प उभे राहिले. रस्त्याच्या कडेला आणि चांगले लोकेशन असेल तर जमिनीचे दर कोटींमध्ये आहेत. घरे, दुकान, प्लॉटिंगमध्ये ही गुंतवणूक वाढली आहे.
- सत्तार शेख, उपसरपंच, पिसादेवी, ता. छत्रपती संभाजीनगर
शहरात फ्लॅट, रो-हाऊस घेणे मध्यमवर्गींयांच्या बजेटच्या बाहेर गेले. त्यामुळे आता बीडबायपास परिसराला लोक पसंती देत आहेत. नवीन बायपास झाला तसेच सिडकोच्या प्लॅनमध्ये येथे मोठ-मोठे रस्ते टाकलेले आहेत. यामुळे बायपास परिसरात मोठमोठे गृह प्रकल्प होत असून, जमिनीचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहे.
- पंजाबराव तौर, सहसचिव, क्रेडाई
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.