Sambhaji Nagar Loksabha Result  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Loksabha Result : भुमरेंच्या रूपाने मराठवाड्यात महायुतीचा एकमेव खासदार

मराठवाड्यात लोकसभेच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) मतदारसंघात शिवसेनेचे संदीपान भुमरे यांच्या रूपाने महायुतीला एकमेव खासदार मिळाला.

- शेखलाल शेख

मराठवाड्यात लोकसभेच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) मतदारसंघात शिवसेनेचे संदीपान भुमरे यांच्या रूपाने महायुतीला एकमेव खासदार मिळाला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर बालेकिल्ल्यातच शिवसेना विरुद्ध शिवसेना; तसेच अनेक वर्षे सोबत काम केलेले दोन दिग्गज नेते समोरासमोर होते. ऐनवेळी जाहीर झालेली उमेदवारी, भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची सुरवातीला नाराजी, स्वतःच्या पक्षाचे मजबूत संघटन नसतानाही भुमरे यांनी १ लाख ३४ हजार ६५० मतांनी एकतर्फी विजय मिळविला. यासाठी त्यांना भाजपच्या यंत्रणेची नियोजनबद्ध साथ मिळाली. शिवाय मराठा फॅक्टर खूप प्रभावी ठरला.

शिवसेनेचे संदीपान भुमरे, शिवसेना (उबाठा) चे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्या तिरंगी लढत झाली. महायुतीत हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला येणार, यावरून भाजप आणि शिवसेनेत शेवटच्या दिवसापर्यंत रस्सीखेच झाली. यात उमेदवारी मिळविण्यात शिंदे गटाने बाजी मारली. इतकेच नव्हे, तर काही दिवसांच्या प्रचारावर आपला विजय साकार केला. त्यांना कन्नड, गंगापूर, वैजापूर, औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील आमदारांची जोरदार साथ मिळाली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची नाराजी असताना चंद्रकांत खैरे यांना निष्ठेचे फळ म्हणून उमेदवारी देण्यात आली. पक्षाचे मतदारसंघात चांगले संघटन, मागील चार टर्मचा खासदार असलेले नेटवर्क त्यांच्याकडे होते. मात्र, त्यांना याचा पुरेपूर उपयोग करता आला नाही. शिवसेना (उबाठा) पदाधिकारी, कार्यकर्ते सोबत असले तरी त्याचे फळ मतदानातून काही दिसत नाही. शिवाय मागील काळात खासदार असताना काही लोकांची नाराजीही त्यांना भोवली. त्यामुळे चारवेळा खासदार, दोनवेळा आमदार अशी तीस वर्षे लोकप्रतिनिधी असलेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला. पराभव तर झालाच, शिवाय त्यांच्यावर तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची नामुष्कीही आली.

मिळालेली मते

संदीपान भुमरे (शिवसेना)

४,७६,१३०

इम्तियाज जलील (एमआयएम)

३,४१,४८०

चंद्रकांत खैरे (शिवसेना, उबाठा)

२,९३,४५०

वंचित’ सोबत नसल्याचा तोटा

मागील निवडणुकीत एमआयएमसोबत वंचित बहुजन आघाडी होती. त्यांची आणि मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते इम्तियाज जलील यांना मिळाली, तर दुसरीकडे अपक्ष असलेले हर्षवर्धन जाधव यांनी लक्षणीय मते घेतल्याने मत विभाजनात इम्तियाज जलील यांची लॉटरी लागली होती. मात्र, यंदा वंचित सोबत नसल्याने; तसेच वंचितचे अफसर खान यांनी ६९ हजार २६६ मते मिळविल्याने एमआयएमच्या हक्काच्या मुस्लिम मतांमध्ये दोन वाटेकरी झाले. शिवाय भुमरे आणि खैरे यांच्यात समसमान अशी मतांची विभागणी न झाल्याने एमआयएमचा पतंग कटला. मात्र, त्यांनी औरंगाबाद मध्य आणि पूर्व या दोन विधानसभा मतदारसंघांत आघाडी घेतल्याने महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांना त्यांनी आगामी विधानसभेसाठी सूचक इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

SCROLL FOR NEXT