Aurangabad  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : ‘औरंगाबाद’ नावाच्या फलकांवर फेकले दगड

खासदार जलील यांच्या नावाला फासली शाई

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरात रविवारी हिंदू जन गर्जना मोर्चा संपल्यानंतर घरी जाताना मोर्चेकऱ्यांनी औरंगपुरा ते निराला बाजार मार्गावर फलकांवर ‘औरंगाबाद’ असा उल्लेख दिसेल तिथे दगडफेक केली.

महापालिका शौचालयावरील ‘औरंगाबाद’ उल्लेखाच्या फलकावर चिखल फासला. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरातील कोनशिलेवर खासदार इम्तियाज जलील यांचा उल्लेख होता. त्यांच्या नावावर शाई फासली. यानंतर पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त लावला.

छत्रपती संभाजीनगर नामांतराला समर्थनासह अन्य मागण्यांसाठी आज सकाळी क्रांती चौक ते अदालत रोड मार्गे औरंगपुरा असा विराट ‘हिंदू जन गर्जना मोर्चा’ निघाला. मोर्चाच्या सांगतेवेळी हैदराबाद येथील भाजपचे आमदार राजासिंह ठाकूर यांनी आक्रमक भाषण केले. याठिकाणी हजारो तरुण आले होते. भाषण सुरू असतानाच शिवसेना भवनावरून काही तरुणांनी दगडफेक केली. भाषण संपल्यानंतर परतताना यापैकी काहींनी ‘औरंगाबाद’ उल्लेख दिसेल त्या फलकांची नासधूस केली.

औरंगपुरा येथील सभेच्या ठिकाणाहून ५० मीटरवर महापालिकेचे सुलभ शौचालय आहे. त्याच्या फलकावरील ‘औरंगाबाद’ उल्लेखाला चिखल फासला. सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या बसथांब्यावरील ‘औरंगाबाद’ उल्लेखाचा फलक फोडला.

त्यापुढील बसथांब्यावरील बस वेळापत्रकाचा फलक काढून चिखलात टाकण्यात आले. ॲक्सिस बँकेच्या शाखेवर ‘औरंगाबाद’ असा उल्लेख दिसल्याने त्याठिकाणी मोर्चेकऱ्यांनी दगडफेक केली. दुकानांबाहेरील ‘औरंगाबाद’ उल्लेखाचे पोस्टरही फाडण्यात आले. दगडफेकीतील दोघांना पोलिसांनी धरून ठेवले होते.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती अनुराधा चव्हाण यांनी सिडको चौक ते हर्सूल रस्त्यावरील एसबीआय चौकातील पिरॅमिडजवळील ‘आय लव औरंगाबाद’चा डिजिटल फलक फोडला. मोर्चा निघाल्यानंतर औरंगपुरा, निराला बाजार, सिल्लेखाना चौक, पैठणगेट, क्रांती चौक, एसबीआय चौक आदी ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त होता.

जलील यांचे नाव खोडण्याचा प्रयत्न

क्रांती चौकात वर्षभरापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला. चौथऱ्याशेजारी असलेल्या कोनशिलेवर खासदार इम्तियाज जलील यांचे नाव होते. मोर्चाच्या दरम्यान, काही उपस्थितांनी जलील यांच्या नावावर पेनातील शाई फासत नाव खोडण्याचा प्रयत्न केला. मोर्चा संपल्यानंतरही क्रांती चौकात पोलिस कुमक वाढण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra: मान्सून जैसे थे! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज; विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात हरकतींचा पाऊस; शेतकरी आक्रमक, ऐतवडे खुर्दमधील 182 एकर सुपीक जमीन होणार बाधित

SAFF Women Football: 'त्या' दोन पराभवांचा बदला घेणार? भारतीय महिला फुटबॉल संघासमोर बांगलादेशचे तगडे आव्हान; आजपासून थरार!

Pimpri: उद्योगनगरीत मेट्रोचा विस्तार कासवगतीने;उद्योगनगरीत मेट्रोचा विस्तार कासवगतीने

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

SCROLL FOR NEXT