sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : ऐन सणासुदीत ठणठणाट

जायकवाडीत स्पार्किंग, जलवाहिनी फुटली,प्रशासन गुंतले मंत्रिमंडळ बैठकीच्या तयारीत

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - शहराच्या पाणी पुरवठ्यावरील संकटांची मालिका सुरूच असून, बुधवारी (ता. १३) सायंकाळी जायकवाडी येथील पंपहाऊसच्या वीज उपक्रेंद्रात स्पार्किंग होऊन दोन्हीही योजना बंद पडल्या. नेमके याचवेळी नक्षत्रवाडीजवळ १२०० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनीही फुटली.

त्यामुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले आहे. ऐन सणासुदीत पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सध्या मंत्रिमंडळ बैठकीच्या तयारीच्या अनुषंगाने व्यस्त असल्याने पाणी पुरवठ्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.

शहराचा पाणी पुरवठा विविध कारणांमुळे वारंवार खंडित होत आहे. कधी वीज पुरवठा खंडित होतो तर कधी पाइपलाइन फुटते. त्यामुळे शहरातील वेळापत्र कोलमडले आहे. अनेक भागांना सहा ते सात दिवसाआड पाणी दिले जात आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेसाठी जायकवाडी धरणाच्या परिसरात पंपहाऊस उभारण्यात आले आहे. या पंपहाऊसला चोवीस तास वीज पुरवठा व्हावा यासाठी वीजेचे उपकेंद्र आहे. एक्स्प्रेस फिडरही देण्यात आले आहे.

असे असताना गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. बुधवारी सायंकाळी ४.५५ वाजता पंपहाऊसच्या परिसरातील वीज उपकेंद्रात स्पार्किंग झाले आणि दोन्हीही योजना पूर्णपणे बंद पडल्या. याचवेळी दुपारी चार वाजेच्या सुमारास नक्षत्रवाडी येथे १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली.

श्रीहरी असोसिएट्सच्या माध्यमातून नक्षत्रवाडी जवळ ९०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकली जात आहे. त्यावेळी जेसीबी मशिनचा धक्का लागून १२०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा एअर व्हॉल्व्ह फुटला आणि हजारो लिटर पाणी वाया गेले, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

वेळापत्रक ढकलले पुढे

दरम्यान, जलवाहिनीतील पाणी काढल्यानंतर दुरुस्तीचे काम सुरु केले जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले असून, या दुरुस्तीच्या कामासाठी काही वेळ लागण्याची शक्यता असल्याने शहरास होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT