Sambhaji Nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : १६ लाख २० हजार हेक्टरवर ,खरिपाची पेरणी जून संपत आला, तरीही मराठवाड्यात मोठा पाऊस नाही

मराठवाड्यातील पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी २२ जून अखेरपर्यंत केवळ २ लाख ४३ हजार ६३० हेक्टर क्षेत्रच विमा संरक्षित करण्याला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत गुरुवारपर्यंत (ता. २०) १६ लाख २० हजार ५८५ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी २२ जून अखेरपर्यंत केवळ २ लाख ४३ हजार ६३० हेक्टर क्षेत्रच विमा संरक्षित करण्याला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत गुरुवारपर्यंत (ता. २०) १६ लाख २० हजार ५८५ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. पीकविमा संरक्षित केलेल्या मराठवाड्यातील ४ लाख २२ हजार ४३४ शेतकऱ्यांच्या २ लाख ४३ हजार ६३० हेक्टरमध्ये छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यांतील २ लाख ५९ हजार ३४० शेतकऱ्यांच्या १ लाख २४ हजार ५८१ हेक्टर, तर लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांतील १ लाख ६३ हजार ४ शेतकऱ्यांच्या १ लाख १९ हजार ४९ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

पीकविमा योजनेअंतर्गत राज्यात खरीप हंगाम २०२४ साठी पीकविमा भरण्याची सुरवात मंगळवारपासून (ता. १८) करण्यात आली आहे. जवळपास १४ पिकांसाठी १५ जुलैपर्यंत एक रुपयाप्रमाणे पीकविमा भरता येणार आहे. भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ, कारळ, कपाशी, कांदा आदी पिकांसाठी पीकविमा उतरवता येईल. पीक कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणीमध्ये करणे आवश्यक आहे.

शासकीय जमीन, अकृषिक जमीन, कंपनी, संस्था, मंदिर, मशीद यांची जमीन आदींवर पीकविमा काढता येणार नाही. पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर त्यांना विमा अर्ज भरण्याच्या अंतिम मुदती आधी किमान सात दिवस बँकेत विमा हप्ता न भरण्याबाबत कळविणे गरजेचे आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सातबारा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन बँकेत किंवा सेतू सेवा केंद्राच्या मदतीने पीकविमा योजनेत सहभाग घेता येईल. विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी केंद्रास ४० रुपये मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिले आहे. संबंधित विमा कंपनी हे मानधन देते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपयाप्रमाणे रक्कम सीएससी चालकांना द्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT