Chhatrapati Sambhaji Nagar Clashes Sakal Digital
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : पोलिसांच्या अंगावर फेकल्या पेट्रोल भरलेल्या बाटल्या

किराडपुरा परिसरात समाजकंटकांनी दगडफेक केल्याने पोलिस जखमी झाले.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : किराडपुरा परिसरात समाजकंटकांनी दगडफेक केल्याने पोलिस जखमी झाले. पोलिसांवर पेट्रोलने भरलेल्या बॉटल्सही फेकल्या होत्या. शेवटी बळाचा वापर करून तीन ते साडेतीनच्या सुमारास जमावाला पांगविण्यात यश आले, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

आयुक्त गुप्ता यांनी सांगितले, की रात्री अकरा ते साडेअकरादरम्यान काही तरुणांत किरकोळ भांडण झाले. दोन्ही बाजूंचे चार- चार तरुण होते. नंतर काही तरुण निघून गेले. त्यानंतर मात्र गर्दी गोळा झाली, त्या गर्दीला पोलिसांनी पांगविले. तासाभराने मोठ्या संख्येने जमाव जमला आणि जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी बऱ्यापैकी नियंत्रणात आणले, मात्र समाजकंटकांची संख्या जास्त असल्याने त्यांना पांगवता आले नाही. नंतर आपण स्वतः डीसीपींसह अतिरिक्त फोर्स जाऊन घटनास्थळी धाव घेत जमाव पांगविला. साधारण एक ते दीड तास हा प्रकार सुरू होता.

काय म्हणाले पोलिस आयुक्त?

  • समाजकंटकांनी त्या भागातील दिवे फोडले, दाट अंधारातही जमाव पांगविला.

  • गुन्हा दाखल केला असून आठ विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत.

  • एसआरपीच्या कंपन्या आल्या आहेत, इतर ठिकाणाहून वरिष्ठ अधिकारी दाखल.

  • जमावाने तासभर दगडफेक केली. पोलिस महासंचालकांना घटना कळविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT