Aurangabad Crime News esakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Crime : पोलिसांनी जप्त केली धारदार तलवार

जाधववाडी वस्तीवर राहणाऱ्या तरुणाकडे धारदार तलवार असल्याची माहिती मिळाली.

सकाळ डिजिटल टीम

Sambhaji Nagar Crime - तालुक्यातील पाल येथील जाधववाडी वस्तीवर राहणाऱ्या एका तरुणाकडून फुलंब्री पोलिसांनी धारदार तलवार जप्त केली आहे. या प्रकरणी सदरील तरुणावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेत जेरबंद करण्यात आले. विक्रम संजय धनावत (रा. जाधववाडी वस्ती, पाल ता. फुलंब्री) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे हे पोलिस हेड कॉन्स्टेबल राजू तेलगोटे यांना सोबत घेऊन सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करीत होते.

त्यांना पाल येथील जाधववाडी वस्तीवर राहणाऱ्या तरुणाकडे धारदार तलवार असल्याची माहिती मिळाली होती. यावरून पोलिस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली होती. त्यावरून पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांनी सापळा रचला.

पाल येथील जाधववाडी वस्तीवर जाऊन विक्रम धनावत यांच्या घरी जाऊन छापा टाकला असता धारदार तलवार मिळून आली.

ही कारवाई पोलिस अधिक्षक मनीष कलवनिया,अपर पोलिस अधिक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर, पोलिस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्रीनिवास धुळे, पोलिस हेडकॉन्स्टेबल मुजीब सय्यद, पोलिस हेड कॉन्स्टेबल राजू तेलगोटे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT