Sambhaji Nagar education  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : शिक्षकांअभावी शाळा पडल्या ओस; शिक्षकांची तब्बल २२७ पदे रिक्त, जिल्हा परिषदेत कसे मिळणार दर्जेदार शिक्षण ?

तालुक्यातील बऱ्याच गावातील चौथी पर्यंतच्या शाळेवर एक शिक्षक तर सातवी पर्यंतच्या शाळेवर दोन शिक्षक आहे.

राजानंद सुरडकर, कन्नड

Sambhaji Nagar - कन्नड तालुक्यात केंद्रीय प्राथमिक शाळा आणि जिल्हा परिषद प्रशालेच्या, मराठी व उर्दू माध्यमाच्या वीस केंद्रातील शाळांमधील तब्बल २२७ शिक्षकांची पदे रिक्त आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असून वरिष्ठांनी दखल घेऊन त्वरित तालुक्यातील रिक्त जागा भराव्या, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

कन्नड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या २० केंद्रातील ३०४ प्राथमिक शाळा, १० प्रशाला व उर्दू माध्यमाच्या ६ शाळांमध्ये शिक्षकांची १ हजार ३६२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १ हजार १३५ शिक्षक कार्यरत असून २२७ पदे रिक्त आहेत. प्रशालेच्या १० शाळांमध्ये शिक्षकांची ८७ पदे मंजूर असून ६९ शिक्षक कार्यरत आहेत तर १८ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे उर्दू माध्यमाच्या ६ शाळांमध्ये शिक्षकांची २७ पदे मंजूर असून केवळ १४ शिक्षक कार्यरत असून १३ पदे रिक्त आहेत,

अशी माहिती गटशिक्षणाधिकारी शेषराव गंडे यांनी दिली.

तालुक्यातील बऱ्याच गावातील चौथी पर्यंतच्या शाळेवर एक शिक्षक तर सातवी पर्यंतच्या शाळेवर दोन शिक्षक आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार याकडे शिक्षण विभागाने गांभीर्याने लक्ष दिले तरच ग्रामीण भागातील शाळा टिकतील नाहीतर खाजगी शाळा, इंग्रजी शाळा शिक्षण विभागाच्या आशिर्वादाने भरभराटीस येतील.

-डॉ.सीताराम जाधव, अध्यक्ष, राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून राज्य शासन जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याच्या नुसत्या वल्गना करत असल्याचे वास्तव समोर आले आहे. ऐन परीक्षेच्या वेळेला कॉफी मुक्त अभियान राबविण्यात येते जर आत्ताच सर्व विषयाचे शिक्षक शाळेवर दिले तरच दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल व खऱ्या अर्थाने कॉफी मुक्त परीक्षा होईल.

- सुभाष निकम, जिल्हा अध्यक्ष,आम आदमी पार्टी

केंद्रनिहाय शिक्षकांची रिक्त पदे याप्रमाणे

के.प्रा.शा. अंधानेर ११, औराळा ५, बहिरगाव ७, चिकलठाण ४, चिंचोली लिंबाजी २१, चापानेर ६, देभेगाव ३, देवगाव रंगारी ५, हतनूर ८, जेहूर १२, कन्नड नं १- ६, करंजखेडा १५, नाचनवेल १२, नागद १२, नागापूर १८, शफेपुर १५, शेलगाव १४, वासडी १२, विटा ६, वडनेर ४ तर प्रशाला अंधानेर २, बहिरगाव १, चिकलठाण ४, चिंचोली लिंबाजी ३, हतनूर ४, कन्नड २, नाचनवेल २, नागद २, वासडी २.

उर्दू माध्यमाच्या शाळा

कन्नड नंबर १-२, कन्नड नंबर.२-२, देवगाव रंगारी १, कुंजखेडा ७ आणि घाटशेंद्रा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT