murder  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : धक्कादायक.. मुलाने केला सावत्र आईचा खून

वैजापूर तालुक्यातील आगरसायगाव येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

Sambhaji Nagar - एका तरुणाने आपल्या सावत्र आईला बेदम मारहाण करून खून केला.नंतर स्वता विहिरित उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले.मात्र,परिसरतील नागरिकांनी या तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना तालुक्यातील आगरसायगाव येथे शनिवारी (ता.१) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शेत वस्तीवर घडली.

आशाबाई घमाजी जाधव (वय ४८ रा. अगरसायगाव ता. वैजापूर ) असे या घटनेतील मयत आईचे नाव असून,नानासाहेब घमाजी जाधव (वय ३३) राहणार अगरसायगाव असे खून करणाऱ्या सावत्र मुलाचे नाव आहे,याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नानासाहेब यांचा आपल्या सावत्र आई आशाबाई यांच्याशी शेतीच्या कारणावरून वाद झाला होता.

या वादातून नानासाहेब याने शनिवार सकाळी साडेअकरा वाजेचा सुमारास विळ्याने गळ्यावर व चेहऱ्यावर वार केले. गंभीर दुखापत झाल्याने आशाबाई यांचा जगेच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, उपनिरीक्षक पाटील,

उपनिरीक्ष रज्जाक शेख,ज्ञानेश्वर शिंदे,भगवान सिंगल,पवार,गणेश पठारे,आय बाईक पथकाचे जोणवाल, गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. व घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविचछेदनासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT