Sambhaji Nagar Shocking The accused in the rape case abducted the minor girl and tortured her rmn00 esakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar: धक्कादायक! बलात्कार प्रकारणातील आरोपीने अल्पवयीन मुलीला पळवून नेत केला अत्याचार

Sambhaji Nagar Shocking The accused in the rape case abducted the minor girl and tortured her rmn00

रुपेश नामदास

छत्रपती संभाजीनगर, ता. ६ ः घरातून औषधी घेण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलीला पळवून नेत अनेक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराने अत्याचार केला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतले.

रोहीत राजू घुले (वय २२, रा. आनंदनगर, पुंडलिकनगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक १४ वर्षीय मुलगी हरविल्याची नोंद करण्यात आली होती.

तपास सुरु असताना तीला अट्टल गुन्हेगाराने नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी सदर मुलीचा शोध घेत, मुलीची पोलिसांनी विचारपूस केली असता, ती मेडीकलहून औषधी घेतल्यानंतर घरापर्यंत सोडण्यासाठी म्हणून आरोपीच्या दुचाकीवर बसली होती.

मात्र त्याने शहराबाहेर नेवून तरुणीवर अत्याचार केला. हा गुन्हेगार शुक्रवारी (ता. सहा) परिसरात आल्याची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक राजश्री आडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक शेषराव खटाने यांनी त्याला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार - प्रफुल पटेल

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

Pachod Theft : चोरट्यांनी बनविले शेतकऱ्यांना 'लक्ष्य'! पाणी असूनही पिकांची होरपळ; दोनशेवर शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाचे केबल रात्रीतून लंपास

SCROLL FOR NEXT