Sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : एकाच प्रभागाच्या दीडशे फायली निकाली

झटक्यात झटकली फाईलींवरची धूळ!

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या विविध विभागात शहरातील विकास कामांच्या फायली धूळखात पडून आहेत. छोट्या-छोट्या कामाच्या फायली वर्षभरापासून जागच्या हालत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे गतवर्षीच्या बजेटमधील तब्बल २९३ कोटी ५० लाखांची स्पीलची कामे यंदाच्या बजेटमध्ये प्रशासनाला घ्यावी लागली. त्यामुळे जुन्या पडून असलेल्या फायलींना प्रशासनाने हात घातला आहे. एकाच प्रभागाच्या तब्बल दीडशे फायलींचा निपटारा करण्यात आला आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात विकास कामांसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाते, पण जेमतेम शंभर ते दीडशे कोटींचीच कामे वर्षभरात होतात. त्यात अधिकारी, आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी शिफारस केलेल्या कामांनाच प्राधान्य दिले जाते. इतर कामे आवश्‍यक असताना देखील फायली धूळखात पडून राहतात.

आर्थिक वर्षे संपल्यानंतरही या फायलींना कोणी हात लावत नाहीत. त्यात अत्यावश्‍यक कामाच्या म्हणजे, ड्रेनेज दुरुस्ती, नाल्यावर ढापे टाकणे, पाइपलाइन दुरुस्ती अशा कामाच्या अनेक फायली अडकून पडल्या होत्या. यासंदर्भात शहर अभियंता ए. बी. देशमुख यांनी सांगितले की, गतवर्षीच्या स्पीलच्या कामाचा आकडा तब्बल २९३ कोटी ५० लाखावर गेला. त्यामुळे अत्यावश्‍यक कामाच्या फायली तातडीने निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार प्रभाग एक मधील सुमारे दीडशे फायली निकाली काढण्यात आल्या आहेत. या फायलींमध्ये काही फायली एक लाख रुपयांच्या कमी रकमेच्या होत्या, पण विविध कारणांमुळे ही कामे होत नव्हती. आता इतर प्रभागाच्या पडून असलेल्या फायली मंजूर केल्या जाणार आहेत.

दप्तर दिरंगाईचा फटका

कामाला मंजुरी घेणे, अंदाजपत्रक तयार करणे, अंदाजपत्रकाला मंजुरी घेणे, निविदा प्रक्रिया राबविणे, निविदा प्रक्रियेला मंजूरी घेणे, निविदा मंजुरी, त्यानंतर कार्यारंभ आदेश अशी फायलींची लांबलचक प्रक्रिया आहे. या लांबलचक प्रक्रियेत काही फायली विविध विभागात तशाच पडून राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT