Sambhaji Nagar Sowing hope in suicide-hit family Doctors will be anointed in adverse situations  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : आत्महत्याग्रस्त कुटुंबात आशेची पेरणी; प्रतिकूल परिस्थितीत अभिषेक होणार डॉक्टर

सततची नापिकी आणि कर्जाची चिंता यामुळे व्यंकट यांनी आत्महत्या केली. त्यामुळे देशमुख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

सकाळ डिजिटल टीम

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर - पिकते पण भाव नसल्याने विकत नाही. भाव असला तरही पाऊसपाण्याने पीक टिकत नाही. यालाच कंटाळून येथील व्यंकट देशमुख या अल्पभूधारक शेतकऱ्याने पाच वर्षांपूर्वी आत्महत्या केली.

त्यामुळे घरातील कर्ता पुरुषच गेल्याने कुटुंबाची प्रचंड ओढाताण होत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत व्यंकट यांचा मुलगा अभिषेक याने निटमध्ये यश मिळवले. आता त्याला लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एबीबीएससाठी प्रवेश मिळाला. त्यामुळे त्याच्या कुटुंबात आशेची पेरणीच झाली आहे.

सततची नापिकी आणि कर्जाची चिंता यामुळे व्यंकट यांनी आत्महत्या केली. त्यामुळे देशमुख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबातील सर्व सदस्य नैराश्यात होते. मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करावा,

हा प्रश्न होता. पण, या प्रतिकूल परिस्थितीवर अभिषेक कधी रडत, कुढत बसला नाही. त्याने अभ्यासात सातत्य ठेवले. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. पुण्यजागर प्रकल्पातून त्याला शैक्षणिक मदत मिळाली.

दहावीत तो ९२ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला. पुढे त्याने बारावी आणि वैद्यकीय प्रवेश पत्रता परीक्षेत चांगले यश मिळाले. त्याचीच फलश्रुती म्हणजे त्याला आता एबीबीएससाठी प्रवेश मिळाला आहे.

‘पुण्यजागर’चे सहकार्य

अभिषेकच्या आई विजयमाला देशमुख यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले. त्या उच्च शिक्षित असल्याने नांदेड येथील एका इंग्रजी माध्यमातून शाळेत नोकरी सुरू केली. पण, वेतन अल्प होते.

त्यामुळे त्यांनी शिकवणी वर्ग सुरू केले. त्यातूनही फार काही मिळत नाही. पण, खर्च खर्च भागत आहे. अशातच अभिषेकच्या शिक्षणासाठी पुण्यजागर प्रकल्पाचे सहकार्य मिळाले.

माझ्या यशात आई, माझे काका मनोज आणि आमोल देशमुख यांचे खूप मोठे योगदान आहे. वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या शैक्षणिक वाटचालीत पुण्यजागर प्रकल्पाचे खूप मोठे सहकार्य लाभले आहे.

- अभिषेक देशमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

SCROLL FOR NEXT