संभाजीनगर  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : 'लालपरी'त महिला क्रांती, एसटीच्या इतिहासात प्रथमच महिलेने सिल्लोड मार्गावर चालवली बस

प्रवाशांना घडवला सुखरूप प्रवास

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मध्यवर्ती बसस्थानकातून छत्रपती संभाजीनगर ते सिल्लोड या मार्गावर पहिल्यांदाच महिला चालक रमा रमेश गायकवाड यांनी गुरुवारी (ता. १५) एसटी महामंडळाची लालपरी अत्यंत सफाईदारपणे चालविली.

छत्रपती संभाजीनगर विभागात रमा गायकवाड यांना पहिल्या महिला बसचालक झाल्याचा बहुमान मिळाला. बसचालक रमा गायकवाड यांनी छत्रपती संभाजीनगर ते सिल्लोड या मार्गावर बस चालवून प्रवाशांना सुरक्षित प्रवास घडवला. एसटी महामंडळात नुकतीच महिला चालक कम वाहकांची नियुक्ती झालेली आहे. खडतर प्रशिक्षण घेऊन या महिला चालकांनी महामंडळाच्या बसचे स्टिअरिंग हाती घेतले आहे.

गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता मध्यवर्ती बसस्थानकातून बसने (एमएच-२०-बीएल-२५६५) रमा रमेश गायकवाड (वय-३३) यांनी छत्रपती संभाजीनगर ते सिल्लोड या मार्गावर प्रवासी नेले आणि सिल्लोडहून येणाऱ्या प्रवाशांना शहरात आणले. त्यांच्या बसच्या वाहक श्रीमती आर. आर. खेडकर या महिलाच होत्या हे विशेष होय. त्या छत्रपती संभाजीनगरच्या पहिल्या एसटी बसचालक ठरल्या आहेत.

एसटी महामंडळात २०६ महिला चालक कम वाहकांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात पाच चालक कम वाहक महिला रुजू झालेल्या आहेत. सिल्लोड मार्गावर एसटी बस सफाईदारपणे चालवणाऱ्या रमा गायकवाड यांनी कुठल्याही प्रकारचा संकोच न करता अत्यंत सफाईदारपणे बस चालवली. मध्यवर्ती बसस्थानकाचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक अविनाश साखरे, बसस्थानक प्रमुख संतोष नजन, कनिष्ठ आगार व्यवस्थापक लक्ष्मणराव लोखंडे यांच्या प्रोत्साहनामुळे हे शक्य झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT