sambhaji nagarc sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : जखमीला न्याय देण्यासाठी न्यायाधीश आले पार्किंगमध्ये

लोकअदालतमध्ये मिळाला न्याय मोटार अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला न्यायालयाच्या इमारतीत येणे शक्य नव्हते.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - मोटार अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला न्यायालयाच्या इमारतीत येणे शक्य नव्हते. त्यामुळे लोकअदालतमधील नुकसानभरपाईचा दावा तडजोड करण्यासाठी जिल्हा न्यायाधीश ए. आर. उबाळे हे स्वतः पार्किंगमध्ये पोचले. त्यानंतर दहा लाखांचा दावा साडेसात लाखांमध्ये तडजोड करण्यात आला.

जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत शनिवारी (ता. नऊ) राष्ट्रीय लोकअदालत असल्याने जखमी अर्जदार गोरखनाथ पांडुरंग घुगे यांचे मोटारअपघात नुकसानभरपाईचे प्रकरण तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. जखमी घुगे यांनी ॲड. के. एस. तांदुळजे यांच्यामार्फत १० लाख रुपये नुकसानभरपाईचा दावा दाखल केला होता. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि जखमी अर्जदार श्री. घुगे यांच्यात साडेसात लाख रुपयांमध्ये समझोता झाला.

जखमी श्री. घुगेंना अपघातात ४२ टक्के कायमस्वरूपी अपंग आल्याने त्यांना चालता येत नसल्याने ते कारमध्येच थांबले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर अर्जदार प्रत्यक्ष समोर आवश्यक असल्याने जिल्हा न्यायाधीश ए. आर. उबाळे हे स्वतः तडजोड घडवण्यासाठी पार्किंगमध्ये आले. त्यानंतर ही तडजोड करण्यात आली.

यावेळी विधी सेवा प्रधिकरणाचे सचिव श्रीमती वै. प्र. फडणवीस, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सतीश मुंदवाडकर, सचिव ॲड. सदानंद सोनवणे, अर्जदारांचे वकील ॲड. के. एस. तांदुळजे, विमा कंपनीचे वकील ॲड. के. ए बनकर, ॲड.अनिरुद्ध उस्मानपूरकर तसेच इन्शुरन्स कंपनीच्या विधी अधिकारी रसिका सरदार व ॲड.मधुकर आहेर यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

SCROLL FOR NEXT