Sambhaji Nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : पावसाची ओढ, चिंतेचे ढग;खरीप पिके टाकू लागले माना, दुबार पेरणीचे संकट

मागील दहा ते बारा दिवसांपासून वाळूज परिसरात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जिवाची घालमेल सुरू आहे. पावसाअभावी खरीप पिके माना टाकत आहेत. त्यातून दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची चिन्हे असल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता आहे.

सकाळ वृत्तसेवा

वाळूज : मागील दहा ते बारा दिवसांपासून वाळूज परिसरात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जिवाची घालमेल सुरू आहे. पावसाअभावी खरीप पिके माना टाकत आहेत. त्यातून दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची चिन्हे असल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता आहे. आठवडाभरात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांनी केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता आहे.

यंदा परिसरात मृगाचा पाऊस अगदी सात जूनला सुरू झाला. दोन दिवसांचा मध्यंतरीचा खंड वगळता सलग आठवडाभरापासून मोठा पाऊस नाही. पावसाचे प्रमाण प्रारंभी समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांनी लागवड केली. त्यासाठी महागडी बी-बियाणे, खते आणली. सर्वांनी लागवडी सुरू केल्याने मजुरांचीही पळवापळवी झाली.

अनेकांनी मजुरी वाढवून देत मजुरांना आपल्याकडे नेले. त्यावेळी परिसरातील मजूरही भाव खाऊन गेले, अशा ओढाताणीत शेतकऱ्यांनी काळ्या आईच्या कुशीत बियाणे टाकले. लागवडीच्या वेळी शेतीत ओल बऱ्यापैकी असल्याने पिकांची उगवण चांगली झाली आहे. काही भागांत लागवडीनंतरही पाऊस पडल्याने पिके अंकुरली. त्यानंतर मात्र, पाऊस गायब झाला आहे.

काळ्या निळ्या ढगांची होते फक्त गर्दी

शेतकरी आभाळाकडे टक लावून बसले आहेत. अंकुरलेले बियाणे करपून जाऊ नये, यासाठी शेतकरी वरुण राजाच्या प्रतीक्षेत आहेत. दररोज आकाशात काळ्या निळ्या ढगांची पळापळ होते. गर्दीने दाटून आलेले ढग आता खूप बरसणार असे वातावरण तयार होते. मात्र, त्यानंतर सुटलेला वारा हे सर्व पळवून लावतो. त्यातून पावसाची वाट पाहणारे शेतकरी हिरमुसून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government Scheme : लाडक्या बहिणींनो सावधान! योजनेच्या फॉर्मसाठी जास्तीचे पैसे देताय? सरकारने उचललं 'हे' मोठं पाऊल, सेवा केंद्रचालकांचे धाबे दणाणले

Raj Thackeray: जपानी तरुणीचा व्हिडीओ व्हायरल… राज ठाकरेंनी मोहन भागवतांना विचारला थेट प्रश्न!

Destination Wedding India: डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करताय? उदयपूरशिवाय निवडा हे 4 शानदार ठिकाण, होईल शाही लग्नाचे स्वप्न पूर्ण

हायवे बनवा किंवा टोल वसुली थांबवा! रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मित्र गमावला, तरुणांचा टोल नाक्यावर गोळीबार; चिठ्ठीतून दिली धमकी

Narendra Modi cabinet meeting: मोठी बातमी! मोदी सरकार 'या' राज्याचे नाव बदलणार... कॅबिनेट बैठकीत घेणार महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT