sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Update : शहरासाठी १०० ई-बस,शासनाला पाठविला स्मार्ट सिटीने प्रस्ताव

शहरांचे वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी शासनाने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचे धोरण अवलंबले आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - स्मार्ट सिटी अभियानामार्फत शहरात सध्या १०० शहर बस सुरू आहेत. आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री ई-बस योजना सुरू केली असून, त्यासाठी देशातील १६९ शहरांची निवड करण्यात आली आहे.

त्यात छत्रपती संभाजीनगर शहराचाही समावेश असल्याने मंगळवारी (ता. १२) स्मार्ट सिटीतर्फे राज्य शासनाला १०० बसच्या मागणीचा प्रस्ताव सादर सादर करण्यात आला आहे.

शहरांचे वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी शासनाने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यानुसार केंद्र शासनाने प्रधानमंत्री ई-बस सेवा योजना सुरू केली आहे. त्यासाठी १६९ शहरांची निवड करण्यात आली आहे.

योजनेत पीपीपी तत्त्वावर शहरांना तेथील स्थानिक प्रवासी वाहतुकीसाठी १० हजार ई-बस देण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. निवडण्यात आलेल्या शहरांना पाच ते सहा महिन्यांत ई-बस दिल्या जाणार आहेत. या योजनेच्या लाभासाठी निवड झालेल्या शहरांनी राज्य शासनामार्फत ३० सप्टेंबरच्या आत प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश देण्यात आले होते.

त्यानुसार स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने मंगळवारी हा प्रस्ताव राज्य शासनाला केल्याचे सूत्रांनी सांगितले. या इलेक्ट्रिक बस परचेसिंग पॉवर पॅरिटी (पीपीपी) तत्त्वावर मिळणार आहे. यात केंद्र सरकार ज्या कंपनीशी करार करेल, ती कंपनी बस देणार आहे.

एक लाख लोकसंख्येमागे ६० बस

या बस १२ मीटर, ९ मीटर आणि ७ मीटर अशा आहेत. छत्रपती संभाजीनगर शहराने १२ आणि ९ मीटर लांबीच्या बसची मागणी केली आहे. बसची संख्या ठरविण्यासाठी चार सेक्टर करण्यात आले आहेत. यात २० ते ४० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांना १ लाखामागे ६० बस तर छोट्या शहरांना १ लाख लोकसंख्येमागे २० ते ४० बस देण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहर १० ते २० लाख लोकसंख्येत मोडत असल्याने १०० बस मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारकडून लोकसंख्येनुसार निवड झालेल्या शहरांना अनुदान मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहराची लोकसंख्या १० ते २० लाखांदरम्यान आहे. त्यामुळे शहराला २२ रुपये प्रति किलोमीटर एवढे अनुदान मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT