WATER WATER
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : पाणी योजनेसाठी आले २८९ कोटी

अमृत-२ मधून महापालिकेला निधी प्राप्त

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचा केंद्र शासनाच्या अमृत-२ मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानुसार केंद्र शासनाने महापालिकेला २८९ कोटी रुपयांचा निधी शुक्रवारी (ता. १०) वितरित केला. २,७४० कोटी ७५ लाख रुपये खर्चाच्या या योजनेसाठी केंद्र शासन ४५ टक्के तर राज्य शासन ३० टक्के निधी देणार आहे.

महापालिकेला २५ टक्के निधी स्वहिस्सा म्हणून टाकावा लागणार आहे. अमृत-२ मध्ये योजनेचा समावेश झाल्यानंतर महापालिकेला निधीचा मिळालेला हा पहिला हप्ता आहे

शहरासाठी राज्य शासनाने १६८० कोटी रुपायांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. पण ही योजना पुढे केंद्र शासनाच्या अमृत-२ योजनेत समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर योजना २७४० कोटीवर गेली. त्यानुसार ६८५ कोटी १९ लाख रुपये केंद्र शासनाकडून दिले जाणार आहेत. त्यापैकी २८९ कोटी रुपयांचा पहिला हप्ता शुक्रवारी महापालिकेला प्राप्त झाल्याचे महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले.

ते म्हणाले, की केंद्र शासनाच्या अमृत-२ योजनेत पाणी पुरवठा योजनेचा समावेश झाला आहे. या योजनेतील केंद्र शासनाच्या निधीचा हिस्सा म्हणून २८९ कोटी रुपये पालिका प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाचा हा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून महापालिकेला मिळाला आहे. प्राप्त झालेल्या निधीतून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आवश्यकतेनुसार निधी वर्ग केला जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ही योजना पूर्ण होण्यासाठी महापालिकेच्या हिश्‍शाच्या रकमेचा निर्णय होणे गरजेचे आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने महापालिकेचा हिस्सा राज्याने भरावा, अशी विनंती महापालिकेने तीन वेळा राज्य शासनाकडे केली आहे. पण राज्य शासनाकडून अद्याप निर्णय झालेला नाही. गुरुवारच्या बजेटमध्ये त्यासाठी तरतूद होईल, अशी अपेक्षा होती.

आतापर्यंतचे काम समांतरच्या निधीवर

पाणीपुरवठा योजनेसाठी आत्तापर्यंत समांतर पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर निधीतून करण्यात आले आहे. समांतर पाणीपुरवठा योजनेचा महापालिकेकडे ३३५ कोटी रुपयांचा निधी पडून होता. यातील २५६ कोटी रुपये आतापर्यंत महापालिकेने नव्या पाणी पुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिले आहेत. त्यानंतर आता केंद्र शासनाकडून निधीचा ओघ सुरू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT