tender sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : पाणी योजना बळकटीसाठी निघाली सातव्यांदा निविदा

शहरासाठी नव्या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असले तरी ही योजना पूर्ण होईपर्यंत नागरिकांना दिलासा

राजेश नागरे

छत्रपती संभाजीनगर : शासनाने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या पाणी पुरवठा योजनेचे बळकटीकरण करण्यासाठी १९३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. यातील नवीन जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याच्या कामासाठी प्रतिसाद मिळत नसल्याने आता सातव्यांदा निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शहरासाठी नव्या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असले तरी ही योजना पूर्ण होईपर्यंत नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी जुन्या ७०० मिलिमीटर व्यासाच्या पाणी पुरवठा योजनेचे बळकटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी १९३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या अमृत-२.० योजनेतून यासाठी निधी मिळणार आहे.

बळकटीकरणाचे काम करताना ७०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी बदलून ९०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्याशिवाय फारोळा येथील जुन्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. फारोळा येथेच नवीन जलशुद्धीकरण केंद्र बांधले जाणार आहे.

नक्षत्रवाडीच्या डोंगरावर संतुलित जलकुंभाचे (एमबीआर) बांधकाम केले जाणार आहे. यातील जलवाहिनीच्या कामांच्या निवेदाला प्रतिसाद मिळाला आहे, पण जलशुद्धीकरण केंद्र आणि एमपीआरच्या कामासाठी काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळालेला नाही. या कामासाठी सहावेळा निविदा काढण्यात आली, त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे सातव्यांदा निविदा काढण्यात आल्याची माहिती प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT