पाणपोई sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : तब्बल चाळीस वर्षांपासून पाणपोईची अविरत सेवा

सिल्लोड : वयाच्या १०२ व्या वर्षी हाजी शेख रूस्तम तत्पर

सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड : पाण्यासारखे पुण्य नाही, पाणी वाटपासारखा धर्म नाही. या उक्तीप्रमाणे मागील चाळीस वर्षांपासून अविरतपणे सिल्लोड येथील बसस्थानकावर पाणपोईद्वारे प्रवाशांना मोफत पाणी देण्याचे काम १०२ वर्षांचे हाजी शेख रुस्तुम आजही आनंदाने करीत आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

चाळीस वर्षांपासून कोणत्याही नागरिकांना काहीही न मागता पाणी वाटपाचे काम ते करतात. देईल ते घ्यायचे नाहीतर पाणी वाटपाचे काम करीत रहायचे हा त्यांचा नित्यक्रम आहे. समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून बसस्थानकावर उन्हाळ्यातील चार महिने शहरातील व्यापारी परिवाराच्या वतीने पाणपोई चालविण्यात येते. या कार्यासाठी त्यांनी चाळीस वर्षांपासून शेख रूस्तम यांच्या हाती पाण्याचा पेला दिला.

त्यांच्याकडून जो मोबदला मिळेल त्याची वाच्यता कोठेही होत नाही. पाणपोईची व्यवस्था करणारे, तटस्थ उभे राहत पाणी पाजणारे आणि याठिकाणी पाण्याचा पुरवठा करणारे हे सर्व हा नित्यनेम काटेकोरपणे पाळत आहे. यासाठी एसटी आगार प्रशासनाचे मोलाचे सहकार्य नेहमीच मिळत आहे.

शहरातील माधवदास कटारिया यांनी चाळीस वर्षांपूर्वी पाणपोई उपक्रमाची बसस्थानकावर सुरूवात केली. त्यांच्या दुसऱ्या पिढीने देखिल हा उपक्रम गाजावाजा न करिता सुरू ठेवला आहे. याठिकाणी नाममात्र शुल्कामध्ये शहरातील शेख अकिल बडेमिया हे टॅंकरद्वारे पाण्याचा पुरवठा नियमित करतात.

शहरातील ईदगाह रस्त्यावरील परिसरात राहणारे हाजी शेख रूस्तम वयाच्या साठ वर्षांपासून हे काम करतात. वयाच्या १०२ व्या वर्षी देखिल त्यांची हे सेवा सुरूच आहे. महाशिवरात्रीपासून जून महिन्यापर्यंत उन्हाळ्यामध्ये पाणी वाटपाचे काम चार महिने सुरू राहते. बसस्थानकावरील पाणपोई व हाजी शेख रूस्तम हे समीकरणच बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT