sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : जिल्हा परिषदेचा जम्बो प्रस्ताव बांधकामची ७२४ कोटी तर कृषीसाठी ३० लाखांचीच मागणी

सर्व विभागांसाठी जिल्हा परिषदेने सुमारे १ हजार ८४८ कोटी ५७ लाखांचे प्रस्ताव तयार केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - नऊ वर्षानंतर शहरात मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी सर्वच विभाग निधीच्या मागणीसाठी प्रस्ताव तयार करीत आहेत. यात जिल्हा परिषदेनेही सर्वच विभागाचे प्रस्ताव तयार केले आहेत.

या सर्व विभागांसाठी जिल्हा परिषदेने सुमारे १ हजार ८४८ कोटी ५७ लाखांचे प्रस्ताव तयार केले आहेत. यात बांधकाम विभाग आघाडीवर असून या विभागाने ७२४ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. तर सर्वात कमीचा ३० लाखांचा प्रस्ताव कृषी विभागाचा आहे.

४९० स्मार्ट अंगणवाड्यांसाठी ८.५७ कोटी.

७२३ नवीन अंगणवाड्या बांधण्यासाठी ८३ कोटी ३४ लाख.

११२० अंगणवाड्यांना वीजजोडणीसाठी ९ कोटी ८५ लाख.

३३३५ वर्ग खोल्यांसाठी ३६८ कोटी.

८२ निजामकालीन शाळा खोल्यांसाठी १.५१ कोटी.

सर्व शाळांना सौर ऊर्जा वीज पुरवठ्यासाठी ६४ कोटी.

म्हैसमाळ, वेरूळ परिसर, सुलीभंजन पर्यटन विकास,

विविध निवासस्थानांचे बांधकामांसाठी ७२४ कोटी.

सिंचनाच्या नवीन ६८ कामांसाठी २१ कोटी

सिंचनाच्या ४२ दुरुस्त्या करण्यासाठी २९ कोटी.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी ३० लाख.

पशुसंवर्धनने मागितले ५०० कोटी

पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे तसेच शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी ३०० कोटींची मागणी केली आहे. तर शेळी गट वाटप करण्यासाठी २०० कोटींची मागणी केली आहे. यात जिल्ह्यातील सुमारे ५ लाखांपेक्षाही जास्त शेतकऱ्यांचा समावेश राहणार आहे. पंचायत विभागाने ही आपला प्रस्ताव तयार केला असून त्यांनी केवळ इमारतीसाठी २९ कोटींची मागणी केली आहे. तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने १० कोटी मागितले आहेत.

जिल्ह्यातील काही ग्रामीण भाग हा आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे. या भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेत असलेल्या विविध विभागांना तसेच नागरिकांच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. यासाठी हा प्रस्ताव तयार केला असून तो मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल. यात जिल्ह्याला झोपते माप मिळेल अशी अपेक्षा आहे.

विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT