Murder esakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : वाहनाला हुलकावणी दिल्याच्या कारणावरून वाद; हल्ल्यात जखमी शेतकऱ्याचा मृत्यू

मारेकऱ्यांना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही

सकाळ डिजिटल टीम

Sambhajinagar Crime - वाहनाला हुलकावणी दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर कुख्यात गुन्हेगारासोबत असलेल्या चार ते पाच जणांनी चाकुहल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा उपचारा दरम्यान शुक्रवारी (ता. सात) पहाटे मृत्यू झाला.

रामचंद्र हिवाळे (वय ३५, रा. देवळाई) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून त्याचे चार साथीदार फरार असल्याची माहिती चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज भालेकर (रा. निपाणी) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मारेकऱ्याचे नाव आहे. तर मुकुंद भालेकर, विकास घोडके व दोन अनोळखी साथीदार (सर्व रा. निपाणी) हे फरार आहेत. मृत रामचंद्र हिवाळे हे बुधवारी (ता. पाच) रात्री १० वाजेच्या सुमारास चारचाकी वाहनातून परत येत असतांना केंब्रीज चौकाजवळ त्यांच्या वाहनास भालेकर याच्या वाहनाने हुल दिली होती.

त्यावेळी रामचंद्र हिवाळे यांनी भालेकर यांनी त्याचा जाब विचारल्यावर दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर मनोज भालेकर याने हिवाळे यांच्या गाडीची काच फोडली. शाब्दीक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाल्यावर रामचंद्र हिवाळे यांच्यावर मनोज घोडके याने धारदार चाकूने हल्ला केला.

या हल्यात गंभीर जखमी झालेल्या हिवाळे यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता उपचार सुरू असतांना शुक्रवारी (ता. सात) पहाटे त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मारेकऱ्यांना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही.

असा पावित्रा नातेवाईकांनी घेतल्यावर चिकलठाणा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मनोज भालेकर याला अटक केली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT