छत्रपती संभाजीनगर

शहरात पहिल्यांदाच आयएमसी महाभारत इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो

CD
संभाजीनगरात पहिल्यांदाच ‘ट्रेड एक्स्पो’ ---- ‘एसएफएस’ मैदानावर ९ ते १८ ऑक्टोबरदरम्यान आयोजन ---- छत्रपती संभाजीनगर, ता. २२ ः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी व्यवसाय विस्ताराची नवी संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री आणि राज्य शासनाच्या सहकार्याने ९ ते १८ ऑक्टोबर दरम्यान एसएफएस मैदानावर ‘आयएमसी महाभारत इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या उपायुक्त के.व्ही. खरात यांनी दिली. दहा दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात छत्रपती संभाजीनगर, वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, बिडकीन, ऑरिक परिसरातील वस्त्रोद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल, हस्तकला, प्रक्रिया केलेले अन्न, आयटी आणि फर्निचर अशा विविध क्षेत्रांतील उद्योगांना आपली उत्पादने व सेवा सादर करता येतील. भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाच्या प्रोक्योरमेंट अँड मार्केटिंग सपोर्ट (पीएमएस) योजनेअंतर्गत प्रदर्शनातील एकूण ६० पात्र एमएसएमई युनिट्सना आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात आले आहे. ६ चौ.मी. स्टॉल जागेच्या भाड्यावर सर्वसाधारण प्रवर्गातील उद्योगांना ८० टक्क्यांपर्यंत पर्यंत, तर महिला उद्योजक, दिव्यांग, ईशान्य भारत आणि महत्त्वाकांक्षी जिल्हा प्रवर्गातील युनिट्सना १०० टक्के पर्यंत अनुदान मिळणार आहे. प्रवास, प्रसिद्धी आणि वाहतूक खर्चासाठी सर्व प्रवर्गातील पात्र युनिट्सना कंटिजन्सी एक्स्पेंडिचर प्रत्येक सहभागी युनिटमधील एका प्रतिनिधीला प्रवासभाडे देय असेल. - दोनशेंहून अधिक असतील स्टॉल शासकीय अनुदानावर आधारित स्टॉल्सची संख्या मर्यादित असून, सर्व लाभ पीएमएस योजनेच्या अटी व शर्तींनुसार दिले जातील. असे प्रदर्शनाचे समन्वयक व सहायक संचालक अभिजित वैद्य यांनी दिली. २०० हून अधिक उद्योगांचा यात सहभागी होणार असणार असून आतापर्यंत १२० हून अधिक नोंदणी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT