पालिकेची आज सर्वसाधारण सभा,
टॅंकरवाढीसाठी प्रशासनाचा प्रस्ताव
--------
छत्रपती संभाजीनगर, ता. १२ ः महापालिकेची शुक्रवारी (ता. १३) सकाळी अकराला महापौर समीर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा होणार आहे. वरद गणेश मंदिराखालून जाणारा नाला वळविणे, टॅंकरच्या संख्येत वाढ करण्यासोबत विविध भागांतील गाळे भाड्याने देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सभेसमोर ठेवला आहे.
समर्थनगर येथील वरद गणेश मंदिराच्या खालून जाणारा नाला वळविण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. हा नाला सामासिक अंतरातून वळविण्यासाठी ७२ लाख ३२ हजार ४७८ रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. शुक्रवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला. तसेच शहराभोवतालच्या सुमारे १८० ते २०० नागरी वसाहतींमध्ये जलवाहिनी नसल्याने ‘नो नेटवर्क’ भागात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठा व्यवस्थेचा मुदतवाढ खर्च आणि पुढील वर्षाच्या टँकर पुरवठ्याचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहे. ५ कोटी ३९ हजार २७४ चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या प्रस्तावातील ४ कोटींचा मुदतवाढ खर्च आणि ५.०१ कोटींचे अंदाजपत्रक अंतिम निर्णयासाठी व मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेच्या समोर ठेवण्यात आले आहे.
-----
व्यापारी संकुलाचा प्रस्ताव
महापालिकेच्या मालकीची प्रभाग क्रमांक २२ मधील सीटीएस क्रमांक १५०९ येथे ५३३ चौरस मीटर जागा आहे. याशिवाय या जागेच्या दक्षिणेकडे सुमारे ६०० चौरस मीटर क्षेत्र उपलब्ध आहे. अशा १२०० ते १३०० चौरस मीटर जागेचे योग्य नियोजन करून त्यावर नागरिकोपयोगी सुविधा उभारण्याची मागणी प्रस्तावातून करण्यात आली आहे. या प्रभागात कामगार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि झोपडपट्टी परिसरातील नागरिकांची मोठी वस्ती आहे. त्यामुळे शिक्षण आणि आरोग्य सुविधा परिसरातच उपलब्ध होणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.