Samriddhi Highway Accident: Esakal
छत्रपती संभाजीनगर

Samruddhi Highway Accident: मध्यरात्र, रस्त्यावर थांबलेला ट्रक अन् देवदर्शनावरून निघालेली बस, क्षणार्धात 12 जणांचा मृत्यू, थरकाप उडवणारे Photo

छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)
Samriddhi Highway Accident

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांचे सत्र सुरूच आहे. छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये दहा ते बारा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान बालकांचा देखील समावेश आहे.

Samriddhi Highway Accident

सैलानी येथील दर्गावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली. मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला आहे.

Samriddhi Highway Accident

या भीषण अपघातात दहा ते बारा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परत जात असतांना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे.

Samriddhi Highway Accident

ट्रॅव्हल्स बसने ट्रकला मागून जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. अपघातात मृतांमध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे. हे सर्व भाविक नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.

Samriddhi Highway Accident

या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 30 प्रवासी प्रवास करत होते. बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून हे प्रवासी पुन्हा नाशिककडे परतत होते. त्यावेळी हा अपघात झाला आहे. यामध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे.

Samriddhi Highway Accident

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वैजापूरसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना तात्काळ मदत सुरू केली. जखमींना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिस आधिक तपास करत आहेत.

Samriddhi Highway Accident

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर आरटीओच्या वतीने ट्रक अडवण्यात आला आणि तो बाजूला घेत असताना मागून आलेली टेम्पो ट्रॅव्हलर या ट्रकला धडकली. या अपघातात एका लहान मुलाचे आई-वडीलांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. तो रडून रडून आई-वडिलांना बोलवत होता. सदरील अपघातानंतर सर्व जखमी रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT