छत्रपती संभाजीनगर

हद्दीच्या वादामुळे तक्रारीला विलंब

CD
हद्दीच्या वादात तक्रारीला विलंब ---- ‘समृद्धी’वरील लूट प्रकरणः दोन पोलिसांची बदली? ----- वैजापूर, ता. १ (बातमीदार) ः समृद्धी महामार्गावरील हडस पिंपळगाव येथे फॉर्च्युनर कार अडवून चालकाच्या गळ्यातील सुमारे दीड लाखाची सोन्याची साखळी लुटल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणात तक्रार दाखल करण्यास झालेल्या विलंबामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैजापूर व वीरगाव पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्याला यासाठी जबाबदार धरून त्यांना मुख्यालयात पाठविण्याची कारवाई केल्याची माहिती आहे. ‘समृद्धी’वरील हडस पिंपळगाव येथे २६ ऑगस्टला दुपारी चारच्या सुमारास संशयितांनी फॉर्च्युनर कार अडविली. चालकाला मारहाण करून सोन्याची साखळी हिसकावून पोबारा केला. घटनेनंतर फिर्यादी तक्रार देण्यासाठी वीरगाव पोलिस ठाण्यात गेला. मात्र, घटनास्थळ कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते, यावरून त्याला वैजापूर अथवा शिल्लेगाव पोलिस ठाण्यात जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर वैजापूर पोलिस ठाण्यातही हद्दीच्या कारणावरून तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, लुटीच्या प्रकरणात एकूण आठ संशयितांचा उल्लेख असून, आतापर्यंत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित सात संशयितांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईटवर बंदी; पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय

Astrology: पुढच्या 48 तासांत बदलतीये ग्रह दशा! चमकणार 'या' राशींचे नशीब; धनलाभासह मिळतील मोठ्या आनंदाच्या बातम्या

Gas Cylinder : घरगुती वापराचा सिलिंडर, खाऊगल्लीत ‘सरेंडर’; शहरातील वाढत्या प्रकारांकडे भरारी पथकांचा काणाडोळा

Marathi News Live Updates : सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल, मनोज जरांगेंची घेणार भेट

Manoj Jarange Patil : उपाशीपोटी कोणी राहू नये म्हणून... आंतरवालीत 3 क्विंटल दाळबाटी!

SCROLL FOR NEXT