Sandipan Bhumare Chandrakant KHaire Sakal
छत्रपती संभाजीनगर

Sandipan Bhumare : खैरेंनी भुमरेंची काढली लायकी! भुमरे म्हणाले, निवडणुकात आमनेसामने या दाखवतो

दोघे एकमेकांवर कायम आरोप करत असतात.

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्यामध्ये कायम आरोप प्रात्यारोप सुरू असतात. लोकसभा निवडणुका लढण्याची संदिपान भुमरे यांची लायकी नाही असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याला भुमरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"खैरे मला म्हणतात की, माझी लायकी नाही, पण त्यांनी लोकसभेला उभं राहावं मग त्यांना कळेल लायकी आहे की नाही ते" असं वक्तव्य संदिपान भुमरे यांनी केलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी दिली तर मी लोकसभा निवडणूक लढायला तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

"काहीही झालं तरी शिवसेना भाजप युतीची ही जागा आहे. त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केले तरी आणच शिंदे साहेब ज्या उमेदवाराला लोकसभेचं तिकीट देतील त्या उमेदवारासाठी आम्ही काम करू. मी पालकमंत्री म्हणून लोकसभेची तयारी सुरू केली आहे, पण शिंदे साहेबांनी मला तिकीट दिलं तर मी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे.

फक्त मी जर लोकसभेसाठी उभं राहिलो तर मला विरोधामध्ये चंद्रकांत खैरे असायला पाहिजेत म्हणजे त्यांना दूध का दूध पानी का पानी करून दाखवू" असं मत पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT