Chandrakant Khaire sandipan Bhumare Sakal
छत्रपती संभाजीनगर

Sandipan Bhumare : "खैरे स्वत:च मला सांगायचे मातोश्रीचं बेक्कार काम झालं"

खैरेंचं डोकं गोमुत्राने धुतलं पाहिजे असंही मंत्री संदीपान भुमरे म्हणाले आहेत.

दत्ता लवांडे

पैठण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठण येथील मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात सभा घेतली. यावेळी भुमरे यांनी पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. तर मुख्यमंत्र्यांची सभा संपल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून रस्ता गोमुत्राने धुवून काढण्यात आला होता. त्यानंतर संदीपान भुमरे यांनी खैरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

(Sandipan Bumare vs Chandrakant Khaire)

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने औरंगाबाद येथे ध्वजारोहणासाठी आले होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले असून मुख्यमंत्र्यांनी हुतात्म्यासाठी फक्त १५ मिनिटे वेळ दिला असून त्यांनी हुतात्म्याचा अपमान केला आहे असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यानंतर, "खैरे यांना आता काय काम राहिलं नाही, त्यांना कोण विचारतं? आम्ही क्रांती केली म्हणून त्यांना आता महत्त्व आलं नाहीतर त्यांना कितीतरी दिवस मातोश्रीवर प्रवेश नव्हता. ते स्वत:च मला म्हणायचे की, भुमरे साहेब आता मातोश्रीचं आता बेक्कार काम झालंय. आता आम्ही त्यांना महत्त्व देत नाही आणि ते काय बोलले त्याला आम्ही उत्तरही देत नाही" असं भुमरे म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सभा संपल्यानंतर गोमुत्राने रस्ता धुतल्याच्या प्रकारावरून भुमरे म्हणाले की, "हे सगळं खैरेंचं काम आहे. त्यांच्या सांगण्यावरून हे काम झालंय पण खरं तर आता खैरे यांचं डोकंच गोमुत्राने धुण्याची वेळ आलीय." असा टोला भुमरेंनी खैरेंना लावला होता.

पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन लोकं बोलावल्याचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात एक ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली होती. त्यानंतर भुमरे यांच्याकडून हा आरोप फेटाळून लावत सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप खैरे यांच्यावर करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT