Sandipanrao Bhumre lok sabha election seat Shiv Sena Shinde group mumbai meeting Sakal
छत्रपती संभाजीनगर

संभाजीनगरची जागा शिवसेना शिंदे गटाला? हालचाली वेग पालकमंत्री भुमरे तातडीने मुंबईला रवाना

भाजप तर्फे लोकसभा उमेदवाराची दुसरी यादी जाहीर झाली. यात वीस जागांची घोषणा करण्यात आली. भाजप मित्रपक्ष असलेला शिवसेना शिंदे गटातर्फे ही जागेचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे.

- प्रकाश बनकर

छत्रपती संभाजीनगर : भाजप तर्फे लोकसभा उमेदवाराची दुसरी यादी जाहीर झाली. यात वीस जागांची घोषणा करण्यात आली. भाजप मित्रपक्ष असलेला शिवसेना शिंदे गटातर्फे ही जागेचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे.

छत्रपती संभाजीनगरची जागा ही युतीत शिवसेनेच्या वाटेवर आहे. ही जागा पुन्हा शिवसेनेला सुटावी यासाठी शिंदे गटातर्फे प्रयत्न करण्यात येत आहे. ही जागे संदर्भात अत्यंत तातडीची बैठक मुंबईत घेण्यात येत आहे.यात पालकमंत्री संदिपान भुमरे यांना संभाजीनगरहून तातडीने मुंबईला येण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार ते पहाटेच मुंबईला रवाना झाले.

गेल्या दोन दिवसांपासून संभाजीनगर च्या जागेसाठी खल सुरू आहेत ही जागा कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटाला ठेवावी अशी मागणी शिवसेना आमदारा तर्फे करण्यात येत आहेत दरम्यान यावर भुमरे यांच्या नावाची चर्चा आहेत व त्यांनाच उमेदवारी जाहीर करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

5 मार्च रोजी अमित शहा यांची छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा झाली. यात संभाजीनगर जागा ही भाजप लढवेल असेअमित शहा यांनी जाहीर केल्यानंतर शिंदे गटातर्फे ही जागा मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या त्यापूर्वी सर्वजण सायलेंट मोडवर होते.

भाजपने मराठवाड्यातील चार जागांची नावे जाहीर केल्यानंतर शिवसेनेतर्फे (शिंदे गट) यांच्यातर्फे ही नावांची घोषणा करण्यात येणार आहे दरम्यान संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात भुमरे यांच्या नावाची चर्चा गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू झाली

आहेत आज तातडीने भुमरे यांना निरोप मिळाल्याने जवळपास त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याचेही बोलले जात आहे. भुमरे सकाळी मुंबईला रवाना झाले. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संभाजीनगर च्या जागे संदर्भात बैठक सुरू असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT