छत्रपती संभाजीनगर

परभणीत दिवाळी पहाटेनिमित्त ‘संगीत रामायण’ कार्यक्रमाचे आयोजन

CD
दिवाळी पहाटनिमित्त ‘संगीत रामायण’ कार्यक्रम -------- शनिवारी पहाटे ६ः३० वाजता गायन, वादन, भरतनाट्यमचा त्रिवेणी संगम सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. ४ : दिवाळी पहाटनिमित्त परभणीकर रसिकांसाठी ‘संगीत रामायण’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मापासून ते लंकेतील रावण वधापर्यंतचा रामायणातील प्रवास या कार्यक्रमातून संगीताच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंतचा सांगीतिक प्रवास घडविणारा हा कार्यक्रम गायन, वादन आणि भरतनाट्यम नृत्य अशा कलांचा त्रिवेणी संगम ठरणार आहे. कार्यक्रमात मयंक परळीकर गायन सादर करणार असून, रामदास कुलकर्णी वादनाची साथ देणार आहेत. ऐश्वर्या डावरे भरतनाट्यमच्या माध्यमातून रामायणातील विविध प्रसंग सादर करणार आहेत. सूत्रसंचालन सौरभ कुरुंदकर करणार आहेत. ९० मिनिटांच्या या सांगीतिक आविष्कारातून रामायणातील महत्त्वपूर्ण प्रसंगांची अनुभूती रसिकांना घेता येणार आहे. भारतीय संगीत, नृत्यकलेचा सुरेल आविष्कार अनुभवण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने परभणीकरांना मिळणार आहे. शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ः३० वाजता नांदखेडा रोडवरील वैष्णवी मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम नियोजित वेळेतच सुरू होणार असल्याने रसिकांनी वेळेपूर्वी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: 'एका अब्दुलने मिशीगन जिंकले; आता दुसऱ्याने यूपीत कमाल करून दाखवावी!' ओवैसींना म्हणायचेय काय?

MSRTC strike Diwali: ऐन दिवाळीत 'एसटी'चा संप! कर्मचाऱ्यांनी दिली राज्यव्यापी आंदोलनाची हाक

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा! किनीतील आंदोलनामुळे कोगनोळीत ट्रकच्या लांबच लांब रांगा

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

कोणाकडे तरी आकर्षित होऊन... वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी का केलं दुसरं लग्न? आता सांगितलं कारण, म्हणाले-

SCROLL FOR NEXT