Chandrakant Khaire vs Sanjay Shirsat esakal
छत्रपती संभाजीनगर

माझ्या आधी खैरेंचा कसा सत्कार करता? भरकार्यक्रमातून शिरसाट चिडून निघाले

खैरे यांचं नाव आधी घेतल्यानं शिरसाट यांचा पारा चढला होता.

सकाळ डिजिटल टीम

खैरे यांचं नाव आधी घेतल्यानं शिरसाट यांचा पारा चढला होता.

औरंगाबाद : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळं शिंदे गट विरुध्द उध्दव ठाकरे गट असा 'सामना' रंगताना पहायला मिळतोय. एकमेकांविरुध्द आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं गणोशोत्सवपूर्वी (Ganeshotsav) प्रथेप्रमाणं आयोजित समन्वय बैठकीत राजकीय नेत्यांच्या मानपमानाचं नाट्यही पाहायला मिळालं.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचा अगोदर सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर उपस्थित असलेले शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) चिडले आणि हे प्रोटोकॉलनुसार चुकीचं असल्याचं म्हणत खुर्चीवरून उठत कार्यक्रम सोडून शिरसाट निघाले होते. दरम्यान, बाजूलाच बसलेल्या एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी त्यांचा हात धरून रोखलं आणि त्यानंतर शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला.

खैरे साहाब.. सिनियर है ना, क्या हुआ?

खैरे यांचं नाव आधी घेतल्यानं शिरसाट यांचा पारा चढला होता. मात्र, इतर नेत्यांनी पुढाकार घेऊन त्यांना बसण्याची विनंती केली. त्यामुळं शिरसाट यांचा राग काही प्रमाणात कमी झाला. मात्र, याचवेळी समोर बसलेल्यांमध्ये एकानं, खैरे साहाब.. सिनियर है ना, क्या हुआ, अशी टिप्पणी केली. त्यावर शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी सिनियर होंगे तो घर पे लेके जाओ, अशी खोचक टिप्पणी केली आणि सभागृहात एकच हशा पिकला. दरम्यान, पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात झालेल्या नेत्यांच्या रुसवे-फुगव्याची जोरदार चर्चा शहरात सुरुय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

MSRTC Officials: एसटीचा तोटा भरून काढा, नाहीतर नोकरी गमवा! प्रताप सरनाईकांचा कामचुकार अधिकाऱ्यांना अल्टिमेटम; ३० दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT