ABD26J82031
गिरगाव ः खंडोबा देवस्थान येथे संत बाळूमामा यांच्या जन्मोत्सवनिमित्त भक्तिगीत गाताना महिला भाविक.
--
ABD26J82030
शिवाजी साखरे यांनी रांगोळीच्या माध्यमातून साकारलेली संत बाळूमामा यांची प्रतिमा.
भक्तिगीतांसह कीर्तनाने गिरगाव दुमदुमले
-
विविध उपक्रमांनी संत बाळूमामांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा
गिरगाव, ता. २४ (बातमीदार) : वसमत तालुक्यातील गिरगाव येथील ऐतिहासिक खंडोबा मंदिर परिसरात शुक्रवार (ता. २३) रोजी संत बाळूमामा यांचा जन्मोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या जन्मोत्सवानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दुपारी तीन ते चार या वेळेत गावातील महिला मंडळाच्या वतीने पाळणा बांधून, पारंपरिक भक्तिगीते व बाळूमामांची गाणी गात मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. जन्मोत्सवानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच रात्री आठ ते दहा या वेळेत नागेलीकर महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. महाराजांनी आपल्या कीर्तनातून संत बाळूमामा यांच्या जीवनकार्यावर व शिकवणीवर प्रकाश टाकला. या सोहळ्यानिमित्त कलाकार शिवाजी साखरे यांनी रांगोळीच्या माध्यमातून संत बाळूमामांची साकारलेली हुबेहूब प्रतिमा भाविकांचे विशेष आकर्षण ठरली. या जन्मोत्सव सोहळ्यास कल्याणराव नादरे, खंडोबा देवस्थान समितीचे अध्यक्ष एकनाथ साखरे, बबनराव मेने, सीताराम साखरे, माणिक दाळपुसे, चांदोजी माळवटकर, तुकाराम पितळे, विठ्ठल दाळपुसे, व्यंकटी नादरे, विठ्ठल हट्टेकर, लखन चंदेवार, पांडुरंग नादरे, मोतीराम साखरे यांच्यासह गावातील महिला, तरुण मंडळी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.