‘संतांच्या विचारांचे आचरण
करणे, हाच खरा भक्तिमार्ग’
देवगाव रंगारी (ता. कन्नड), ता. ७ (बातमीदार) : संतांच्या सहवासातून मनाला शांती मिळते. संत ज्या भक्तीच्या मार्गावरून चालतात, त्या मार्गाची धूळही जीवनाला पावन करणारी आहे. त्यामुळे संतांच्या चरणी आपला जीव अर्पण करून त्यांच्या विचारांचे आचरण करणे, हाच खरा भक्तिमार्ग आहे, असे प्रतिपादन पराग महाराज चातुर्मासे यांनी बुधवारी (ता. ७) केले.
संत तुकाराम महाराज यांच्या शिष्या संत बहिणाबाई यांच्या जन्मोत्सव व पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या सोहळ्यात तिसऱ्या दिवशी कीर्तनसेवा करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या ‘संत मारगीं चालती । त्यांची लागो मज माती ॥’ या अभंगाचे निरूपण केले. यावेळी शिऊर येथील संत बहिणाबाई संस्थानचे मधुसूदन महाराज, महंत सुश्री साध्वी, महंत श्रीकृष्णाणंद, सरस्वती महाराज आक्का, माजी पंचायत समिती सदस्य गोकूळ गोरे यांची उपस्थिती होती. सप्ताहात सकाळी सुरेश मोगल व संध्याकाळी सुभाष भायभंग यांच्या वतीने पंगतीद्वारे महाप्रसाद देण्यात आला. सोहळ्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी (ता. ८) रात्री आठला चैतन्य महाराज निंबोळे नाशिक यांचे कीर्तन होणार आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.