वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना अभिवादन
उमरगा, ता. ३१ (बातमीदार) : शहरासह तालुक्यात सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आले.
- -
महात्मा गांधी विद्यालय
उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था संचलित महात्मा गांधी विद्यालयात मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रीय एकतेची शपथ घेण्यात आली. आनंददायी शनिवारी कार्यानुभव विषयांतर्गत टाकाऊपासून टिकाऊ आकाशकंदील व पणती बनवण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आला. प्रास्ताविक डी. पी. पवार यांनी केले. तर आभार व्ही. जी. गायकवाड पाटील यांनी मानले.
आदर्श विद्यालय
प्राचार्य सैपन शेख यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. पर्यवेक्षिका नीलिमा कुलकर्णी, उपमुख्याध्यापक संतोष कांबळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. तात्याराव फडताळे यांनी सूत्रसंचालन केले. रुकमोद्दीन नदाफ यांनी आभार मानले.
- -
श्री छत्रपती शिवाजी
विद्यालय, तलमोड
भारत शिक्षण संस्था उमरगा संचलित तलमोड येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. मुख्याध्यापक जे. ए. मोरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- -
काँग्रेस समितीतर्फे अभिवादन
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त काँग्रेसच्या उमरगा तालुका शाखेच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले. तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार, उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, शहराध्यक्ष विजय दळगडे, नगरसेवक विशाल काणेकर, बाबा मस्के, जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष याकूब लदाफ, तालुका सरचिटणीस अभिमन्यू भोसले, बलभीम अबुलगे, जीवन सरपे, ॲड. इरफान जमादार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- -