छत्रपती संभाजीनगर

गॅस लाईन फुटली

CD
बायपास परिसरात खोदकाम करताना गॅस लाइन फुटली --- सातारा परिसर, ता. २० ः बीड बायपास परिसरात ड्रेनेज लाइनचे खोदकाम सुरू असताना अचानक भारत गॅसची भूमिगत पाइपलाइन फुटली. त्यामुळे गळती सुरू झाली. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला सकाळी ११.४५ वाजता कॉल आला. यानंतर ड्यूटी ऑफिसर सूरज राठोड आणि त्यांचे पथक अग्निशमन बंबासह तातडीने रवाना होऊन ११.५३ वाजता घटनास्थळी पोचले. गॅस मोठ्या प्रमाणावर लिक होत असल्याने जवानांनी तातडीने परिसरात बॅरिकेडिंग करून नागरिकांना दूर केले. सुदैवाने त्याठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने गॅस हवेत विरघळून जात होता. तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून अग्निशमन दलाने गळतीवर पाण्याचा जोरदार मारा सुरू केला. यानंतर भारत गॅसच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून गॅसचा मुख्य व्हॉल्व्ह बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. भारत गॅसच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी तत्परतेने गळती रोखली आणि दुपारी दोनच्या सुमारास गॅस लाइन पूर्ववत केली, तेव्हा परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. ही कामगिरी मुख्य अग्निशमन अधिकारी खांडेकर आणि उप अग्निशमन अधिकारी संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ड्यूटी ऑफिसर सूरज राठोड, फायरमन दीपक गाडेकर, प्रसाद शिंदे, विक्रांत बकले, उमेश भोसले आणि वाहनचालक एन. आर. घुगे यांच्या पथकाने पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT