फोटोसह ABD26J80756
सती पांग्रा (ता. वसमत) : वाळून गेलेल्या पिकांचे संयुक्त पंचनामे करताना महसूल, कृषी विभाग, ग्रामपंचायतीचे अधिकारी.
------------------
सती पांग्रा येथे पिकांचा पालापाचोळा
-----------
संयुक्त पंचनाम्यासाठी प्रशासन बांधावर
खांडेगाव, ता. ५ (बातमीदार) : वसमत तालुक्यातील सती पांग्रा परिसरात पावसाअभावी हाताशी आलेली खरिपाची पिके पूर्णपणे करपली असून शेतशिवारात केवळ पालपाचोळाच शिल्लक दिसत आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सोमवारी (ता.पाच) तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक ही त्रिस्तरीय समिती थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोचली असून पिकांचे संयुक्त पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
पावसा अभावी पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मेहनत, बियाणे, खते, मशागतीचा खर्चही निघणे अशक्य झाले आहे. या दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या शिक्षणाला बसत आहे. घरची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर आपल्या मुलींचे शिक्षण थांबवण्याची किंवा बंद करण्याची वेळ आली आहे.
पंचनाम्यादरम्यान तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून जिओ टॅगिंगद्वारे नुकसानीची नोंद घेतली. यावेळी शेतातील जळलेली पिके हातात घेऊन शेतकरी व्यथा मांडताना भावुक झाले. शासनाने शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे अशी मागणी यावेळी सती पांग्रा येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.