छत्रपती संभाजीनगर

‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’

CD
‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ ------ जिल्हाधिकारी कर्डिले ः दुष्काळावर मात करण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी पुढाकार घ्यावा ------- सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. २८: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि पशुधनाची काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळा, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. पाणीबचत, जनजागृती आणि लोकसहभागाच्या माध्यमातून दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षकांसह सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांनी शाळेत आणि घरी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. भाजी धुतल्यानंतर उरलेले पाणी झाडांसाठी वापरावे, जलस्रोतांची माहिती घ्यावी, पाणीबचतीबाबत जागृती करावी, अशा छोट्या कृतींतून जलसंवर्धनाचे संस्कार रुजवावेत, असे आवाहन केले आहे. तसेच शिक्षकांनी निबंध, वक्तृत्व, चित्रकला आणि पोस्टर स्पर्धा, प्रभातफेरी, परिसंवाद तसेच पथनाट्यांच्या माध्यमातून पाणीबचत, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि दुष्काळ निवारणाबाबत जनजागृती करावी, असे प्रशासनाने सुचविले आहे. -------- पालकांनीही द्यावा हातभार पालकांनी घरातील पाण्याचा काटकसरीने वापर करावा, नळांची गळती तातडीने दुरुस्त करून घ्यावी आणि मुलांमध्ये वृक्षसंवर्धन, स्वच्छता व निसर्गप्रेमाचे संस्कार रुजवावेत. दिवाळी आणि अन्य सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करून प्रदूषण टाळावे. तसेच, दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी आणि पशुपालक कुटुंबांना चारा व पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. --- शाळांनी कृती आराखडा तयार करावा मुख्याध्यापकांनी शाळास्तरावर पाणीबचत व पर्यावरण संवर्धन समिती स्थापन करावी. शाळेतील जलस्रोतांची तपासणी करणे, पाण्याची गळती रोखणे आणि आवश्यक दुरुस्ती करून घेणे यावर भर द्यावा. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या सहभागातून दुष्काळ निवारणासाठी कृती आराखडा तयार करून स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधावा. --- ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा; जनावरे जगवा, शेतकऱ्यांना साथ द्या आणि पर्यावरण जपा,’ हा संदेश या अभियानातून देण्यात येत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. पाण्याची बचत, पशुधनाचे संरक्षण आणि शेतकऱ्यांना सहकार्य करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणारं उद्घाटन तातडीने रद्द करा; जरांगेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन, भीमाशंकर वृक्षतोड परिसराची केली पाहाणी

Nagpur Graduate Constituency Election : पदवीधरांच्या ढिगभर चुका, १५ हजार मतं बाद; मतदान जनजागृतीचा अभाव

E100 petrol in India : पेट्रोल ७० रुपयांपर्यंत स्वस्त होणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता गाड्या चालणार 'E-100' इंधनावर!

Marathi News Live Updates : जय पवार यांनी घेतली सीआयडी अधिकाऱ्यांची भेट; अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासाबाबत चर्चा!

Drought Crisis: सोयाबीननंतर तूरही धोक्यात!; परतीच्या पावसाने फिरविली पाठ; पेरणी थांबली, विहिरींनी गाठला तळ

SCROLL FOR NEXT