School sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News: शैक्षणिक आरक्षणांच्या भूखंडांची ‘शाळा’

डीटीआरच्या जागा महापालिका देणार खासगी संस्थांना

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : विकास आराखड्यानुसार शैक्षणिक आरक्षणासाठी असलेले शहरातील तीन मोठे भूखंड खासगी संस्थांना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. हे भूखंड शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांकडून महापालिकेला मिळाले आहेत.

महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार शहरातील विविध भागात आरक्षणे टाकण्यात आली आहेत. मात्र, महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे अनेक आरक्षित जागांचे भूसंपादन करण्यात आलेले नाही. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे महापालिकेच्या मालकीचे झालेले आरक्षित भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार नुकतेच जाहीर प्रगटनही देण्यात आले आहे. त्यात या जागा टीडीआरमधून महापालिकेला मिळालेल्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तसेच प्रत्येक जागेचे सिद्ध शिग्र गणकानुसार भाडेही निश्‍चित करण्यात आले आहे. या जागा भाड्याने घेण्यासाठी शैक्षणिक संस्था, बहुउद्देशीय संस्था, सामाजिक संस्था व इच्छुक व्यक्तींकडून स्वारस्य प्रस्ताव (ईओआय) मागवण्यात आले आहेत. या जागा भाडेतत्वावर घेऊ इच्छिणाऱ्यांनी १४ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या आहेत जागा

औरंगाबाद कंस्ट्रक्शन कंपनीतर्फे पर्टनर नितीन बगडिया यांचा गारखेडा भागातील ३६ चौरस मीटरचा भुखंड आहे. ही जागा तीन लाख ४५ हजार ६०० रुपये मासिक भाडे आकारून दिली जाईल.

जुगलकिशोर तापडिया यांच्याकडून कांचनवाडी येथील ४४५० चौरस मीटर भुखंड मिळाला आहे. त्यासाठी एक लाख ६२ हजार ४२५ रुपये मासिक भाडे आकारून भाड्याने दिला जाणार आहे. हिंदुस्तान समूह आवास लि. तर्फे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर सीताराम अग्रवाल यांच्याकडून नक्षत्रवाडी येथील ८८०४.४ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेला भूखंड तीन लाख ७४ हजार १८७ रुपये मासिक भाड्याने प्रशासनाने ठरविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT