चारा टंचाईवर मात करण्यासाठी
शास्त्रीय व्यवस्थापनावर भर
नांदेड, ता. ८ : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध चाऱ्याचा शास्त्रीय पद्धतीने वापर करण्याची गरज आहे. याच उद्देशाने सेवा संकल्प अभियानांतर्गत मंगळवारी (ता. ६) देगलूर उपविभागीय कार्यालयात चारा साक्षरता अभियान राबविण्यात आले. यावेळी निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी युरिया प्रक्रियेचे पशुपालकांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात आले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. उपलब्ध चाऱ्याचे संवर्धन, साठवणूक व शास्त्रीय व्यवस्थापन केल्यास चारा टंचाईच्या काळात पशुधनाला सकस चारा उपलब्ध होऊ शकतो, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सोयाबीन गुळीवर युरिया प्रक्रिया करून तिची पौष्टिकता वाढविण्याचे प्रात्यक्षिक डॉ. एस. आर. यंकम यांनी दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसीलदार सूर्यवंशी, नायब तहसीलदार सरकलवाड, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. आर. व्ही. सुरेवाड व तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. एल. पाशमवार यांच्यासह अधिकारी, शेतकरी व पशुपालक उपस्थित होते.
---
चाऱ्याचा काटकसरीने वापर करावा
शास्त्रीय व्यवस्थापनावर भर उपलब्ध चाऱ्याचे योग्य संवर्धन, साठवणूक आणि शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन केल्यास संभाव्य चारा टंचाईची तीव्रता कमी करता येते. त्यामुळे पशुपालकांनी उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने व शास्त्रीय पद्धतीने वापर करावा, असा संदेश अभियानातून देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.