छत्रपती संभाजीनगर

महापुरुषांचा वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे काळाची गरज..! श्रीमंत कोकाटे : पाथ्री येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात विशेष व्याख्यान

CD
महापुरुषांचा वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे काळाची गरज..! श्रीमंत कोकाटे : पाथ्री येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात विशेष व्याख्यान फुलंब्री, ता.२४(बातमीदार) : अंधश्रद्धा, अज्ञान आणि अंधानुकरणापेक्षा विवेक, तर्क, मानवतावाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरणे ही काळाची गरज आहे. महापुरुषांनी समाजातील अनिष्ट रूढी, विषमता आणि अज्ञानाला प्रश्न विचारून ज्ञान व विवेकाचा मार्ग दाखविला. त्यांच्या विचारांचा चिकित्सक अभ्यास करून मानवतावादी मूल्ये आचरणात आणली पाहिजेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांनी केले. मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाथ्री येथे ‘महापुरुषांचा वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर विशेष व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कन्नडचे माजी आमदार किशोर पाटील होते. श्रीमंत कोकाटे यांनी “विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली...” या संतवचनाच्या संदर्भाने व्याख्यानाला सुरुवात केली. सॉक्रेटिस, ॲरिस्टॉटल, प्लेटो यांच्यापासून गौतम बुद्ध, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांतील ज्ञान, विवेक, मानवता आणि सामाजिक परिवर्तनाचे पैलू त्यांनी उलगडले. अंधश्रद्धा, भोंदूपणा व अवैज्ञानिक प्रथा नाकारून प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजूभाऊ पाथ्रीकर, सचिव उषाताई पाथ्रीकर, सहसचिव वरुणभैय्या पाथ्रीकर, डॉ. अनुताई पाथ्रीकर, जिल्हा परिषद सदस्या गीतांजलीताई पाथ्रीकर, संचालिका कल्याणीताई पाथ्रीकर, प्राचार्य डॉ. सुनील मिरगणे, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते. “आपले निर्णय आपणच विचारपूर्वक घेतले पाहिजेत,” असा संदेश द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांनी दिला. किशोर पाटील यांनी द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांच्याशी असलेल्या मैत्रीचा उल्लेख करून ती कायम राहील, अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनील मिरगणे यांनी केले. डॉ. सचिन मोरे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ. कैलास इंगळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. रश्मीताई पाथ्रीकर यांनी आभार मानले. उपप्राचार्य डॉ. शशिकांत बंडेवार यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले. .....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Mallya : मल्ल्याने म्हटलं बँकांनी जास्त पैसे वसूल केले, पण SBIच्या प्रतिज्ञापत्रात वेगळाच दावा; ८,७५२ कोटी बाकी, पुढे काय होणार?

Asian Games, IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पार चारी मुंड्या चित करत जिंकले GOLD! सलग दुसऱ्यांदा सुवर्णकामगिरी

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

CNG गॅस भरताना टाकीचा स्फोट, कारच्या चिंधड्या; इतर गाड्यांचेही नुकसान, घटनेचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT