छत्रपती संभाजीनगर

सीताखंडी घाटातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा : श्रीजया चव्हाण

CD
सीताखंडी घाटातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा : श्रीजया चव्हाण नांदेड, ता. १४ (बातमीदार) : नांदेड-भोकर या वर्दळीच्या मार्गावरील सीताखंडी घाटात सातत्याने होत असलेल्या अपघातांची गंभीर दखल घेत, अपघात रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आमदार श्रीजया चव्हाण यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सीताखंडी घाटातील तीव्र वळणे, ब्लाइंड स्पॉट्स आणि अतिवेगाने धावणारी वाहने यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होत असल्याचे आमदार चव्हाण यांनी पत्रात नमूद केले. जीवितहानीच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. अपघातप्रवण क्षेत्रे व ब्लाइंड स्पॉट्सवर वाहनचालकांना स्पष्ट दिसतील असे धोक्याचे इशारे देणारे मोठे फलक लावावेत. धोकादायक वळणांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी रबर स्ट्रिप्स बसवाव्यात. तसेच अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी घाटात स्पीडगन सुविधेसह कॅमेरे बसवून वेगमर्यादा ओलांडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. घाटातील वाहतुकीवर चोवीस तास लक्ष ठेवण्यासाठी कायमस्वरूपी पोलिस चौकी उभारावी. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा हा संवेदनशील प्रश्न असल्याने पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, असेही आमदार चव्हाण यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

Wani News : मार्कंडेय पर्वतावर पुन्हा ‘बंदी’चा डोंगर! चार वर्षांत धोकादायक शिड्या-पायवाटांची दुरुस्ती नाही, भाविकांचा संताप

SCROLL FOR NEXT