छत्रपती संभाजीनगर

कर्ज हप्ते कपात न केल्यास उपोषणाचा इशारा

CD
कर्ज हप्ते कपात न केल्यास सेनगावात २७ पासून उपोषण सेनगाव, ता. २४ (बातमीदार) : कर्जदार कर्मचाऱ्यांच्या वेतनातून थकीत कर्ज हप्त्यांची कपात न केल्यास येत्या २७ ऑक्टोबरपासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेने दिला आहे. याबाबत पतसंस्थेचे अध्यक्ष व्ही.डी. देशमुख व सचिव एम.आर. गडदे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले. सेनगाव तालुका जि.प. कर्मचारी पतसंस्था ही स्वभांडवलावर चालणारी नफाक्षम संस्था असून, यंदा सभासदांना १२ टक्के लाभांश वाटप केला जाणार आहे. मात्र, काही कर्जदार सभासद आणि त्यांचे वेतन देयक अधिकारी हप्ते कपातीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कलम ४९ (२) अन्वये पगार कपातीचे हमीपत्र दिलेले असतानाही काही अधिकारी थकबाकीदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप संचालक मंडळाने केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सादर यादीनुसार ऑक्टोबरच्या वेतनातून हप्ते कपात न झाल्यास संपूर्ण संचालक मंडळ बेमुदत उपोषणास बसेल, असा इशारा देण्यात आला आहे. ‘पतसंस्थेचे आणि सभासदांचे आर्थिक हित जपण्यासाठी आम्ही कोणत्याही टोकाच्या संघर्षाला तयार आहोत,’ असे व्ही.डी. देशमुख म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : माहितीच्या विश्लेषणाला नैतिक मूल्यांची जोड देणे आवश्यक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Manoj Jarange Patil : ५०० कोटींच्या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत विषय संपवणार नाही; मनोज जरांगेंचा फडणवीस, शिंदेंना तपासाचे आव्हान

''गेल्या दोन दिवसांपासून आम्ही...''; ५०० कोटींच्या कथित ऑडियो क्लिपबाबत श्रीकांत शिंदे पहिल्यांदाच बोलले, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT