छत्रपती संभाजीनगर

आरोग्य तपासणी, उपचार शिबिर

CD
कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी, उपचार शिबिर कळमनुरी, ता.५ (बातमीदार)ः उपजिल्हा रुग्णालयात ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त नुकतेच आयुष विभागातर्फे सेवा संकल्प अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात १५७ रुग्णांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. यावेळी तज्ज्ञांनी उपस्थित रुग्णांना आयुर्वेदाचे महत्त्व व उपचार पद्धतीबाबत माहिती दिली. उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शेषराव नरवाडे, आयुष विभागाचे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पंचलिंगे, डॉ. बालाजी जाधव, डॉ. सोनाली देशमुख, डॉ. सोफिया खान, डॉ. नावेद अथर यांची उपस्थिती होती. या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांची सामान्य आरोग्य तपासणी व आयुर्वेदानुसार तज्ञांच्या उपस्थितीत प्रकृती परीक्षण केलेल्या रुग्णांच्या आरोग्य स्थितीनुसार आवश्यक आहार विहार व दिनचर्येबाबत मार्गदर्शन करुन औषधोपचार करण्यात आले. याशिवाय वयोमानानुसार सौम्य योगासने, योगाभ्यास घेऊन योगासंदर्भात माहिती देण्यात आली.ज्येष्ठ नागरिकांत आढळून येणाऱ्या हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात, वात विकार, अजीर्ण, बद्धकोष्ठता, निद्रानाश व मानसिक स्वास्थ्य या संदर्भात योग्य वेळी योग्य आहार व नियमित दिनचर्या बाबत ची माहिती तज्ञांनी दिली आरोग्य शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी करून त्यांना आयुर्वेदिक औषधी चे वाटप करण्यात आले. शिबिरात १५७ रुग्णांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालयांतर्गत वैद्यकीय अधिकारी व आयुष विभागांतर्गत तज्ज्ञ, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT