छत्रपती संभाजीनगर

तुळजापूरात जागर साहित्य पुरस्काराचे वितरण.

CD
LRA26A04998 लोहारा ः राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शंकर मक्तेदार याचा सत्कार करण्यात आला. ---- राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शंकर मक्तेदारची निवड लोहारा : शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी शंकर अरुण मक्तेदार याने विभागीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. या कामगिरीआधारे त्याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. शंकरला लहानपणापासून कुस्तीची आवड असून, त्याने नियमित सरावाच्या जोरावर तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या निवडीबद्दल प्राचार्या उर्मिला पाटील, क्रीडा विभागप्रमुख प्रा. प्रशांत काळे, नागनाथ पांढरे, विठ्ठल कुन्हाळे यांच्यासह प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. ----- UMR26A18743 उमरगा ः त्रिकोळीच्या जिल्हा परिषद शाळेला विक्रम इन्फ्रातर्फे इंटरॅक्टिव्ह बोर्ड भेट देण्यात आला. त्रिकोळी शाळेला डिजिटल बोर्ड भेट उमरगा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक डिजिटल शिक्षणाची संधी मिळावी, अध्ययन अधिक सुलभ व आनंददायी व्हावे, या उद्देशाने ‘विक्रम इन्फ्रा’च्या वतीने त्रिकोळी (ता. उमरगा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला एक लाख ४० हजार रुपये किमतीचा इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड भेट देण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण घेता येणार आहे. यावेळी ‘विक्रम इन्फ्रा’चे अप्पा मुसांडे, ॲड. अमित सांगवे, सरपंच मुद्रिकाबाई सुरवसे, उपसरपंच शिवाजी सुरवसे, पोलिस पाटील विकास पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश कोडगीर, मुख्याध्यापक विठ्ठल तेलंग, तंत्रस्नेही शिक्षक सुनील सूर्यवंशी आदी उपस्थित होते. .......................... MKN26A00853 माकणी ः विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धेत माकणी महाविद्यालयाने घवघवीत यश मिळविले. बीएसएस महाविद्यालयाच्या खेळाडूंचा गौरव माकणी : धाराशिव येथे झालेल्या विद्यापीठीय क्रीडा स्पर्धेत माकणी येथील भारत शिक्षण संस्था संचलित बीएसएस कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध मैदानी क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय यश मिळविले. अहिल्या नवनाथ लवटे हिने गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. निकिता शिवाजी राठोड हिने पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय, तर संदीप विष्णू दंडगुले याने दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. शुभम संतोष जाधव याने गोळाफेकमध्ये तृतीय क्रमांक मिळविला. या यशाबद्दल प्राचार्य डॉ. धनंजय माने यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. क्रीडा संचालक डॉ. अनिल पाटील, विभागप्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. .......................................... BMH26A09921 भूम ः माजी मंत्री महादेव जानकर यांनी भूम तालुक्यातील वाकवड येथे दुष्काळाची पाहणी केली. महादेव जानकर यांच्याकडून दुष्काळाची पाहणी भूम : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी सोमवारी (ता. पाच) भूम तालुक्यातील वाकवड येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करपलेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. पावसाचा खंड, पाणीटंचाई व चाऱ्याच्या प्रश्नाबाबत त्यांनी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. वाकवड परिसरात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, काही ठिकाणी हातातोंडाशी आलेली पिके करपली आहेत. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पाहणीदरम्यान त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तातडीने करण्याची सूचना केली. शेतकऱ्यांना योग्य मदत व दुष्काळग्रस्त भागासाठी आवश्यक सवलती मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. ............. WAS26A02908 वाशी ः कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात उद्‍घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर व प्राध्यापक. कौशल्याधारित अभ्यासक्रमांना सुरवात वाशी : पदवीसोबत रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी, या उद्देशाने कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात ब्युटी पार्लर व संवादात्मक इंग्रजी या दोन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना सोमवारी (ता. पाच) प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रामेश्वर कोठावळे होते. पूनम गपाट व वनिता नाईकवाडी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. ब्युटीशियन क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी असून कौशल्याच्या आधारे महिलांना व्यवसाय उभा करता येतो, असे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. कोठावळे यांनी आजच्या काळात पदवीसोबत कौशल्यालाही महत्त्व असल्याचे नमूद केले. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. ......................... UMR26A18739 उमरगा : शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त कार्यक्रम उमरगा : शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये महात्मा गांधी जयंती व आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये अहिंसेचे महत्त्व रुजविण्यासाठी निबंध लेखन स्पर्धा, जनजागृतीपर व्हिडिओ, अ‍ॅनिमेशन सादरीकरण आणि ‘अहिंसा प्रतिज्ञा’ आदी उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी व्हिडिओ व अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून हिंसेचे दुष्परिणाम आणि अहिंसेचे सकारात्मक परिणाम मांडले. निबंध स्पर्धेत महात्मा गांधींच्या सत्य व अहिंसेच्या विचारांचा आजच्या समाजातील संदर्भ स्पष्ट करण्यात आला. विद्यार्थ्यांनी हिंसा टाळण्याची, शांततेचा मार्ग स्वीकारण्याची तसेच समाजात प्रेम व बंधुभाव वाढविण्याची शपथ घेतली. यावेळी शिवाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे, सचिव डॉ. विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष डॉ. अजय बेडदुर्गे, प्राचार्य अल्विन काळे, उपप्राचार्य डॉ. स्नेहल धर्माधिकारी आदी उपस्थित होते. ............................ GNJ26A01194 गुंजोटी : महसूल विभागाच्या पथकाकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली जात आहे. पावसाअभावी पिके कोमेजली गुंजोटी : पावसाने पाठ फिरविल्याने उमरगा तालुक्यातील गुंजोटी परिसरातील खरीप पिकांना मोठा फटका बसला असून, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यास महसूल विभागाने सुरवात केली आहे. महसूल विभागाचे पथक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून नोंद घेत आहे. मंडळ अधिकारी दीपक चव्हाण, ग्राम महसूल अधिकारी संजय कोकाटे व ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर इंगळे यांनी शेतात जाऊन पाहणी केली. सोयाबीन, मूग, उडीद, सूर्यफूल आदी पिकांना पावसाअभावी फटका बसला आहे. नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत व शासकीय सवलती द्याव्यात, अशी मागणी होत आहे. ............... मलंग विद्यालयात मार्गदर्शन शिबिर उमरगा : शहरातील (कै.) शरणप्पा मलंग विद्यालयात इयत्ता आठवीच्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन शिबिर व कार्यशाळा घेण्यात आली. मुख्याध्यापक अजित गोबारे अध्यक्षस्थानी होते. धाराशिवचे डॉ. प्रवीण बनकर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप, अभ्यास नियोजन, गणितीय संकल्पना तसेच मॅट व सॅट या दोन्ही पेपरच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले. सातवीच्या अभ्यासक्रमावरही प्रश्न विचारले जात असल्याने त्याची उजळणी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी कुमारस्वामी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक कविराज रेड्डी, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. ................ फळपिकांना ‘अंबिया बहार’चे संरक्षण भूम : हवामानातील बदलांमुळे फळपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत हवामानावर आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार २०२६-२७ राबविण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा व पपई या फळपिकांचा समावेश आहे. अवेळी पाऊस, कमी-जास्त तापमान, सापेक्ष आर्द्रता, वेगवान वारा व गारपीट यांसारख्या हवामान धोक्यांपासून संरक्षण मिळणार आहे. द्राक्षासाठी अंतिम मुदत १५ ऑक्टोबर, मोसंबी, केळी व पपईसाठी ३१ ऑक्टोबर, आंब्यासाठी ३१ डिसेंबर, तर डाळिंबासाठी १४ जानेवारी २०२७ आहे. अधिसूचित महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ---- शाहिरीतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन माकणी : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अंधश्रद्धा निर्मूलनासोबत वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजाकडे पाहण्याची गरज आहे, असे मत प्रसिद्ध शाहीर जगन्नाथ रामराज जगताप यांनी व्यक्त केले. माकणी येथे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी प्रशालेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक व्यंकटराव गुंजोटे यांच्या हस्ते शाहीर जगताप व त्यांचे सहकारी अंबादास गाथाडे यांचा सत्कार करण्यात आला. शाहिरीच्या माध्यमातून भारत स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, स्त्रीभ्रूण हत्या, हुंडा पद्धती, बेटी बचाओ-बेटी पढाओ, बालशिक्षणाचा हक्क, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन व प्रदूषण आदी विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. दोन्ही कलाकार अंध दिव्यांग असूनही त्यांनी प्रभावी सादरीकरण केले. दीपक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. ............................... MKN26A00855 सास्तूर : येथील श्री शांतेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. रवींद्र मुगळे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. रवींद्र मुगळे यांचा पुरस्काराने सन्मान माकणी : सास्तूर (ता. लोहारा) येथील श्री शांतेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. रवींद्र व्यंकटराव मुगळे यांना जागतिक शिक्षक दिनानिमित्त उमरगा रोटरी क्लबच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय अस्वले होते. आमदार प्रवीण स्वामी, रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल मदनपुरे, सचिव शिवशंकर व्हंडरे, डॉ. अनिकेत इनामदार, व्यापारी नितीन होळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमास शिक्षक, रोटरियन व नागरिक उपस्थित होते. परमेश्वर सुतार यांनी सूत्रसंचालन केले.

IND vs NZ ODI Squad: ट्वेंटी-२० संघ जाहीर केला, मग वन डेचा का नाही? निवड समिती पर्यायी संघ निवडण्याच्या तयारीत; पण असं का?

Navratri 2026: घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त 'या' वेळेत; जाणून घ्या नवरात्रीतील पूजा, नियम अन् शुभ रंग!

Latest Marathi News Live Update : दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीसांची अमित शाहांशी भेट; दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Soybean Crop Issue : सोयाबीनचे दाणे ज्वारी सारखे; शिवना परिसरातील विदारक स्थिती

सध्या काय करते 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर? योगगुरूशी केलं लग्न, नावही बदललं, फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण

SCROLL FOR NEXT