ABD26J81914
((((फोटो ओळ))) सिडको : शारदोत्सवानिमित्त पारंपरिक वेशभूषेत अद्वैत मंडळाचे सदस्य.
----
शारदोत्सवानिमित्त कीर्तन, नृत्य सादरीकरण
----
सिडको, ता. २२ : टाळ-लेझीमचा निनाद, भक्तिरसाने रंगलेले कीर्तन आणि महिलांच्या कलागुणांचे सादरीकरण अशा उत्साही वातावरणात बुधवारी (ता.२२) अद्वैत मंडळ एन-३, एन-४ यांच्या शारदोत्सवाला सुरवात झाली. ‘महाराष्ट्राची शान’ या सादरीकरणातून शारदेचे स्वागत करण्यात आले. डॉ. प्रणिता देशपांडे यांच्या सुश्राव्य कीर्तनाने उपस्थित श्रोते भक्तिरसात तल्लीन झाले.
यावेळी अद्वैत मंडळाच्या वतीने महिलांसाठी मनोरंजक खेळ घेण्यात आले. शिवाय लेझिमचे प्रात्यक्षिक आणि ‘चांदणं चांदणं झाली रात’ या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले. उपाध्यक्ष सुनंदा डबीर यांनी शारदेची बोधपर कथा सांगितली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. प्रणिता देशपांडे यांनी सुश्राव्य कीर्तन सादर केले. त्यांच्या कीर्तनाला संवादिनी आणि तबल्याची साथ लाभली. पाहुण्यांची ओळख सहसचिव कल्पना कुलकर्णी यांनी करून दिली. अध्यक्ष स्वाती कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. प्रणिता देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. कीर्तनातील निरूपण आणि सादरीकरणामुळे उपस्थित श्रोते तल्लीन झाले होते. सुजाता नाईक यांनी सूत्रसंचालन केले. सुनंदा डबीर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सुजाता नाईक, कल्पना कुलकर्णी, प्रिया कुलकर्णी, रेणू अमलेकर, सुनीता कुडे, दुर्गा देशमुख, क्षमा कुरे आणि शिल्पा श्रोत्रे यांनी पुढाकार घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.