share market investment high return scam fraud with 12 people waluj sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर अधिक परताव्याचे आमिष, वाळूज महानगरातील १२ जणांची फसवणूक

Waluj Fraud Crime Update : कामगारांना घातला ६६ लाखांनी गंडा, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

वाळूज : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून वाळूज महानगरातील १२ कामगारांना ६६ लाख आठ हजार ९९० रुपयांना गंडा घातला. फसवणूक झालेल्यांच्या तक्रारीवरून ए.एस. एंटरप्राइजेस कंपनीच्या दोन संचालक बंधूंविरुद्ध वाळूज औद्योगिक वसाहत परिसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

अमोल शंकर दरंदले आणि विक्रम शंकर दरंदले (रा. दोघेही, सोनई, जि.नगर, ह.मु. अष्टविनायक पार्क, वाळूज महानगर-एक) अशी संशयितांची नावे आहेत. कुंभेफळ येथील ड्रीम सिटी (घर क्रमांक २४) भागात राहणारे वैभव ज्ञानेश्वर मुठे हे शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीमध्ये नोकरी करतात.

ते पूर्वी वाळूज औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत कामावर होते. त्यांच्यासोबत अमोल शंकर दरंदले हाही कामावर होता. मुठे यांची त्याच्याशी ओळख होती. मे महिन्यात दरंदले याने मुठे यांना कॉल करून सांगितले की, ‘मी व माझा भाऊ विक्रम ए.एस. एंटरप्राइजेस नावाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो.

त्यातून मोठी कमाई करीत आहे. या एंटरप्राइजेसमध्ये पैशाची गुंतवणूक करणाऱ्यांना प्रत्येक महिन्याला आठ टक्के व्याज दिले जाते. आपण आपल्या मित्र, सहकाऱ्यांना मार्केटिंगकरिता गुंतवणूक केल्यास आठ टक्के व्याज मिळवून देईल, असे आमिष त्याने दाखविले.

मुठे यांनी विश्वास ठेवून १४ लाख ९० हजार पाठवले. नंतर १२ जुलै रोजी मुठे यांना ९९ हजार ९९९ रुपये व १६ जुलैला ५० हजार रुपये असे सुमारे १ लाख ४९ हजार रुपये संशयितांनी यूपीआयद्वारे पाठविले. ही रक्कम मिळाल्यानंतर मुठे यांनी पुन्हा दरंदले याच्याकडे ५० हजार रुपये जमा केले. पण, नंतर ठरल्याप्रमाणे परतावा मिळाला नाही.

यांचीही झाली फसवणूक

सतीश दौलतराव रहाणे (रा. घाणेगाव, ता. गंगापूर) एक लाख रुपये, दिनेश राजपूत (रा. मनाली रेसिडेन्सी, सिडको वाळूज महानगर-एक) एक लाख ९८ हजार ९९९ रुपये, तुषार सुपेकर (रा. विमानतळाजवळ, छत्रपती संभाजीनगर) ९ लाख ७३ हजार रुपये,

संतोष माणिकलाल शेट्टी (रा. कासलीवाल मार्बल, बीड बायपास छत्रपती संभाजीनगर) ४ लाख ९९ हजार ९९३, दीपक पांडे (रा. अजय हाइट्स, सातारा परिसर)३ लाख ५० हजार, संदीप शेळके (रा. उक्कडगाव रोड, वैजापूर) १ लाख ९९ हजार ९९८ रुपये, सोमनाथ नेहे (रा. महावीरनगर, तीसगाव वाळूज महानगर) ६ लाख १५ हजार, प्रशांत कदम (सिडको वाळूज महानगर) ४ लाख ९९ हजार रुपये,

सुमीत गिरी (रा. आर्या ईश्वरी पार्क, वाळूज महानगर-एक) १ लाख ३९ हजार रुपये, अमोल डांगे (रा. कुंभेफळ) ७ लाख ४४ हजार रुपये, योगेश कौतिक पाटील (रा. सिडको वाळूज महानगर) ७ लाख ५० हजार रुपये असे मिळून ५० लाख ६८ हजार ९९० व मुठे यांचे १५ लाख ४० हजार अशा एकूण ६६ लाख ८ हजार ९९० रुपयांचा गंडा दरंदले बंधूंनी घातला. या दोघा भावांवर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद राहणार

SCROLL FOR NEXT