छत्रपती संभाजीनगर

आतापर्यंत शेख नासेरने केला तीनशेपेक्षा जास्त मृतांचा दफनविधी

महापालिकेच्या बाजूला असलेल्या चितेखाना कब्रस्तानात ते दफनविधीचे कार्य करतात.

- शेखलाल शेख

औरंगाबाद : मागील वर्षी कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पुढे येण्यास अनेक जण घाबरत होते. जनजागृती झाल्याने आता कोरोनाने मृत झालेल्यांवर अंत्यसंस्कारासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, व्यक्ती पुढे येत आहेत. त्यापैकीच एक आहेत शेख नासेर मोहम्मद. त्यांनी मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून तर आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त कोरोना बळींचा दफनविधी केला आहे. त्यांनी दफनविधी केलेल्यांमध्ये औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण, बीड, जालना, परभणी, नांदेड, बुलडाणा, नाशिक येथील मृत झालेल्या कोरोना रुग्णांचा समावेश आहे. महापालिकेच्या बाजूला असलेल्या चितेखाना कब्रस्तानात ते दफनविधीचे कार्य करतात.

३० ते ३५ वर्षांपासून काम

मागील ३० ते ३५ वर्षांपासून शेख नासेर हे चितेखाना कब्रस्तानात दफनविधीचे काम करतात. येथे त्यांच्या मदतीसाठी शेख अन्वर, युसूफ खान हे दोघेजण आहेत. एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास नातेवाईक शेख नासेर यांना संपर्क करतात. त्यानंतर येथे कबर खोदण्यापासून तर अंत्यविधीचे कार्य पार पाडण्याचे काम ते करतात. यासोबत ते जामा मशीद कब्रस्तान येथे सुद्धा अंत्यविधीचे कार्य पार पाडतात. यासोबत जेथून फोन येतो तेथे मदतीसाठीही जातात.

कोरोना रुग्णांचा दफनविधी

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून मराठवाडा, बुलडाणा, नगर, खानदेश येथील गंभीर रुग्ण उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात येतात. यामध्ये सर्वाधिक मराठवाड्यातील रुग्ण असतात. यात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यास नातेवाइकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मृत हा मुस्लिम समाजातील असल्यास शक्यतो चितेखाना, जामा मशीद कब्रस्तानात दफनविधी केला जाते. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून तर आतापर्यंत जवळपास ३०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा दफनविधी शेख नासेर यांनी केला आहे.

दफनविधीसाठी पीपीई किट, सॅनिटायझर आम्हाला महापालिकेकडून मिळते. दफनविधी करताना मोजकेच नातेवाईक येथे असतात. आम्ही दफनविधी केलेले कोरोना रुग्ण मराठवाड्यातील जिल्ह्यातील, ग्रामीण भागातील जास्त प्रमाणात आहेत. तसेच दफनविधीनंतर मृतांचे नातेवाईक त्यांच्या परीने आम्हाला आर्थिक मदत सुद्धा देतात.

- शेख नासेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Changes : रामनवमीनिमित्त पुणे शहरात गुरुवारी वाहतुकीत बदल

भारत पाकिस्तानसारखा 'दलाल देश' नाही; सर्वपक्षीय बैठकीत इराण युद्धात मध्यस्थीच्या मुद्द्यावर जयशंकर यांचं उत्तर

Solapur News : विखे-पाटलांचे कडक आदेश: अधिकाऱ्यांची पळापळ, माढ्यात पाणीच पाणी!

Customs Duty: कस्टम ड्यूटी पेमेंटमध्ये मोठा बदल! UPI द्वारे पेमेंटला मंजुरी; CBIC चा मोठा निर्णय, नेमकी प्रक्रिया काय?

वकिलाचे न्यायमूर्ती झालो, आता निवृत्तीला आलो तरी रुग्णालय नाही; मेळघाटातल्या कुपोषणावरून हायकोर्टानं सरकारला फटकारलं

SCROLL FOR NEXT