sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : चोवीस कोटी वसुलीसाठी शेंदूरवादा महावितरणची मोहीम सुरू ; ३२ गावांतील ग्राहकांकडे थकबाकी वाढली

महावितरण’ने वसुलीची मोहीम हाती घेतली असल्याने या मोहिमेतून थकबाकीदार ग्राहकांवर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

शेंदूरवादा : शेंदूरवादा (ता.गंगापूर) येथील महावितरणच्या कार्यालय अंतर्गत येणाऱ्या ३२ गावांतील ग्राहकांकडे असलेली २४ कोटी ४० लाख रुपयांची वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी परिसरात ‘महावितरण’ने वसुलीची मोहीम हाती घेतली असल्याने या मोहिमेतून थकबाकीदार ग्राहकांवर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.

महावितरणच्या शेंदुरवादा परिसरात यंदा थकबाकीचा डोंगर काहीसा कमी करण्याच्या मानसिकतेत ग्राहक आहे. कोरोनानंतर दोन वर्षे थकबाकीचा आकडा चिंताजनक होता. मात्र, आता वसुलीला सुरुवात झाल्यापासून थकबाकी कमी होणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

एकूण थकबाकीमध्ये कृषिपंप, पाणीपुरवठा, सार्वजनिक दिवाबत्ती ग्राहकांचा नंबर लागतो. वाढत्या थकबाकीमुळे ‘महावितरण’लाच थकबाकीचा ‘शॉक’ बसल्याने महावितरणने वसुली मोहीम तीव्र केली आहे. ग्राहकांकडून जुन्या व नवीन वीज बिल वसुलीसाठी येथील महावितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची फिरती पथके तयार केली आहेत.

या पथकांतील कर्मचाऱ्यांकडून, तसेच मोबाईलद्वारे मॅसेज पाठवून निवासी, शेतीपंप, पथदीप, शासकीय व निमशासकीय थकीत ग्राहकांनी बिल भरणा न केल्यास वीजजोडणी खंडित करण्याचा इशाराही दिला आहे. सध्या महावितरण कर्मचाऱ्यांना त्या-त्या भागातील थकीत ग्राहकांची यादी घेऊन कर्मचारी वसुली करताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi FIR प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाने स्वतःचाच आदेश थांबवला, नेमकं काय घडलं?

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

TCS प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना! तुळशी माळ काढून महिलेला दारू-सिगारेट पाजली; नंतर धमकी देत धर्मांतर अन् अत्याचार

आयुष्यात काही तरी कमी पडतंय... मराठमोळ्या अभिनेत्रीची इंस्टापोस्ट व्हायरल, मोठा निर्णय घेत म्हणाली-

RCB vs DC Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वाघांची 'शेळी' झाली! दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट गोलंदाजी केली; दोनशेपार जाणारा संघ ढेपाळला

SCROLL FOR NEXT