Chandrakant Khaire vs Eknath Shinde  esakal
छत्रपती संभाजीनगर

'दिघे असते तर त्यांनी शिंदेंना उलटं टांगलं असतं'; खैरेंच्या वादग्रस्त विधानानंतर शिंदे गट आक्रमक

निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे.

औरंगाबाद : निवडणूक आयोगानं (Election Commission) शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह (Shiv Sena) गोठवलं आहे. आता ठाकरे गट (Thackeray Group) किंवा शिंदे गटाला (Shinde Group) हे चिन्ह वापरता येणार नाहीय. अंधेरी पोटनिवडणूक आता धनुष्यबाण चिन्हावर लढवता येणार नाही. अंधेरी पोटनिवडणुकीपूरता हा निर्णय असेल.

महत्त्वाचं म्हणजे, शिवसेना पक्षाचं नाव देखील दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटांना आयोगाला पर्याय द्यावं लागणार असल्याची माहिती आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर दोन्ही गटांत जोरदार वाद सुरुय. दरम्यान, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना शिंदे गटाबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आलाय.

शिंदे गटाकडून खैरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

यामुळं खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आलीय. यासाठी पोलिसांत तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं धनुष्यबाण गोठवण्याचा निकाल दिल्यानंतर दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांविरुध्द आरोप-प्रत्यारोप सुरुय. याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना खैरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) जोरदार टीका केली.

'..तर आनंद दिघेंनी एकनाथ शिंदेंना उलटं लटकवलं असतं'

आज आनंद दिघे असते तर त्यांनी एकनाथ शिंदे यांना उलटं लटकवलं असते, असं खैरे म्हणाले होते. त्यांच्या याच विधानावरून आता शिंदे गटानं आक्रमक भूमिका घेतली असून खैरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आलीय. याप्रकरणी औरंगाबादमधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस (Aurangabad Police) आयुक्त कार्यालयात धाव घेत, चंद्रकांत खैरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असून, त्यांच्याबद्दल खैरे यांनी केलेलं विधान चुकीचं असल्याचं शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडला दुसऱ्या तुरुंगात हलवणार का? दोषमुक्तीच्या अर्जाचं काय झालं? उज्ज्वल निकमांनी सविस्तर सांगितलं

Video: किती हा निर्दयीपणा! मनोरंजनासाठी मालकाने नोकरावर सोडला सिंह, भयानक व्हिडिओ व्हायरल

"नातेवाईक जेवण जमिनीवर टाकून खायला सांगायचे" या मराठी अभिनेत्रीचं हलाखीत गेलं बालपण; "जुने कपडे.."

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

WTC 2025-27 ची ऑस्ट्रेलियाकडून दणक्यात सुरूवात! पहिले दोन्ही सामने जिंकत भारत-इंग्लंडला दिलं टेन्शन

SCROLL FOR NEXT