छत्रपती संभाजीनगर

कळसावरील भगवा ध्वजासाठी जीवाची बाजी

CD
SOO26A00015 शिऊर : अण्णा सूर्यवंशी यांचा सत्कार करताना मंदिराचे अध्यक्ष मधुसूदन महाराज, भाऊसाहेब घोडके. ----- संतसेवेसाठी १५० फूट कळसावर चढाई ---- जिवाची पर्वा न करता वर्षानुवर्षे भगवा ध्वज बदलण्याची निःस्वार्थ सेवा ---- शिऊर, ता. ७ (बातमीदार) : येथील संत परंपरा लाभलेल्या संत बहिणाबाई महाराज समाधी मंदिर व संत शंकर स्वामी महाराज समाधी मंदिराच्या कळसावरील भगवा ध्वज बदलण्याचे जोखमीचे धार्मिक कार्य आर.बी. सोसायटीचे माजी व्हाइस चेअरमन अण्णासाहेब सूर्यवंशी हे अनेक वर्षांपासून निःस्वार्थपणे करीत आहेत. कोणतेही मानधन अथवा मोबदला न घेता केवळ श्रद्धा आणि सेवाभावातून ते ही सेवा बजावत आहेत. संत शंकर स्वामी महाराजांचे समाधी मंदिर तब्बल १५० फूट, तर संत बहिणाबाई महाराजांचे मंदिर ८५ फूट उंच आहे. उन्हामुळे कळसावरील भगवा ध्वज खराब होत असल्याने वर्षातून दोन ते तीनवेळा तो बदलावा लागतो. हे जोखमीचे काम सूर्यवंशी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता करतात. ‘मी ध्वज बदलण्यासाठी वर जात नाही, तर संत बहिणाबाई महाराज, संत शंकर स्वामी महाराजच मला वर घेऊन जातात. काही ठिकाणी लोखंडी कड्यांवर पाय ठेवण्यासाठी उंची कमी पडते. अशावेळी मंदिराच्या बांधकामातील हत्तीच्या नक्षीचा आधार घेतो’, असे अण्णासाहेब सूर्यवंशी यांनी सांगितले. ---- ((कोट)) संत बहिणाबाई मंदिराचा ध्वज सोमवारी (ता. पाच) लावण्यात आला. वर्षातून तीनवेळा हे कार्य सूर्यवंशी करतात. त्यासाठी ते कोणताही मोबदला घेत नाहीत. - भाऊसाहेब घोडके, मंदिर विश्वस्त

Rahul Gandhi: ''माझ्याविरोधात 45 एफआयआर आहेत, 100 पाहिजेत...'' राहुल गांधींनी सुरु केला रस्त्यावरचा एल्गार

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतरकडे निघालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी अडवले; राहुल गांधी, प्रियंका गांधी ताब्यात

IND vs NZ ODI Squad: ट्वेंटी-२० संघ जाहीर केला, मग वन डेचा का नाही? निवड समिती पर्यायी संघ निवडण्याच्या तयारीत; पण असं का?

DCM Sunetra Pawar : दुष्काळाची जाणीव ठेवा; ऊस जगविण्याचे आव्हान मोठे

Navratri 2026: घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त 'या' वेळेत; जाणून घ्या नवरात्रीतील पूजा, नियम अन् शुभ रंग!

SCROLL FOR NEXT